🛣️ विकासाची वाटचाल
मंगरूळपीरच्या नव्या ओळखीचा प्रारंभ!
मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) :
गेल्या काही वर्षांत विकासाच्या संधी जणू वाट चुकल्या होत्या, पण आता मंगरूळपीरच्या नशिबाला नवी दिशा मिळू लागली आहे. शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या जुन्या व जीर्ण बसस्थानकाला नवसंजीवनी देण्याचा मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला असून, हा प्रकल्प म्हणजे शहराच्या कायापालटाचा प्रारंभबिंदू ठरणार आहे.
आमदार मा. श्याम लक्ष्मीबाई रामचरण खोडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बसस्थानकाची जागा आता केवळ प्रवाश्यांची गर्दी सांभाळणारे ठिकाण राहणार नसून, सुमारे ७५ दुकाने, मॉल्स, प्रशस्त हॉल, गाड्यांच्या पार्किंगची उत्तम व्यवस्था आणि आधुनिक सोयींनी सजलेलं एक बहुउद्देशीय संकुल तयार होणार आहे.
या प्रकल्पामुळे शहरात नवे रोजगार निर्माण होणार, तर व्यापाऱ्यांसाठी सुवर्णसंधीचा दरवाजा उघडणार आहे. विशेष म्हणजे, हे संकुल शहराच्या सौंदर्यात भर घालणार असून, मंगरूळपीर हे एक आकर्षक आणि व्यापारी दृष्टिकोनातून सक्षम शहर म्हणून पुढे येणार आहे.
सध्या या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल. नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम मंगरूळपीरच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
आ. श्याम खोडे यांच्या सक्रिय सहभागामुळे रस्त्यांचं मजबुतीकरण, गटारींचं सुशोभीकरण, स्ट्रीट लाइट्सचं सुलभ नियोजन यासह अनेक उपक्रम राबविले जात आहेत. परंतु या बसस्थानक प्रकल्पाच्या निमित्ताने शहराचा जो "चेहरा मोहरा" बदलेल, तो
आमदारांचे मनोगत :
"मंगरूळपीरसारख्या ग्रामीण भागातही विकासाची स्वप्ने साकार करता येतात, हा विश्वास आम्हाला आहे. केवळ डांबरी रस्ते किंवा इमारती बांधणे हाच विकास नव्हे, तर त्या माध्यमातून सामान्य जनतेचे जीवनमान उंचावणे हेच आमचे खरे उद्दिष्ट आहे.
बसस्थानकाचा कायापालट हा फक्त एका इमारतीचा नव्हे, तर संपूर्ण शहराच्या भावी स्वरूपाचा आराखडा आहे. नव्या पिढीसाठी रोजगार, व्यापाऱ्यांसाठी संधी आणि नागरिकांसाठी सुविधा यांची सांगड घालणारा हा प्रकल्प मंगरूळपीरच्या विकासयात्रेतील मैलाचा दगड ठरेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
जनतेच्या अपेक्षा आमच्यासाठी आदेश आहेत. मी आणि माझी टीम दिवस-रात्र कामाला लागलेली आहे, आणि लवकरच मंगरूळपीर 'स्मार्ट शहरांच्या' यादीत सामील व्हावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."_
मंगरूळपीरच्या उज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
शहरवासीयांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. "विकास हवा पण दिसणारा हवा" अशी अपेक्षा घेऊन वाट पाहणाऱ्या जनतेला आता प्रत्यक्ष कृतीची जाणीव होत आहे.
“आपले मंगरूळपीर – नव्या वाटेवर, नव्या उजेडात!”
0 Comments