Ticker

6/recent/ticker-posts

सागर जी भुतडा : माणुसकीच्या बँकेचा शिलेदार!


– प्रेम, आपुलकी आणि समाजभान यांचा संगम असलेलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व  सागर जी भुतडा


✍🏻  | वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी 


सामान्य माणसांच्या जीवनात आर्थिक व्यवहारांमध्ये बँक असते, पण काही लोक बँकेच्या माध्यमातून थेट माणसांच्या हृदयात पोहचतात. सागर जी भुतडा हे असंच एक नाव, जे विदर्भ  कोकण  बँकिंग क्षेत्रात एक विश्वासाचं प्रतिक बनलं आहे.

ते कुठंही गेले, तिथं विश्वास घेऊन गेले. त्यांनी आकड्यांच्या जगात राहूनही माणसांशी नातं जोडलं. बँकेचं दरवाजा जरी अधिकृत असला, तरी आतून प्रेम आणि आपुलकीचा दरवाजा उघडलेला असतो – हे सागरजींच्या वागण्या-बोलण्यातून उमजतं.

त्यांचा शांत, सौम्य, आणि सुसंस्कृत स्वभाव, समाजातील कोणत्याही स्तरातल्या व्यक्तीशी सहज संवाद साधतो. गरजू शेतकरी असो, मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा एखादा तरुण – सगळ्यांचं ऐकून घेणं, समजून घेणं आणि शक्य ती मदत करणं, ही त्यांची एक ओळखच बनली आहे.

आज त्यांचा वाढदिवस!
हा दिवस त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्याचा –
एक असा दिवस, जिथं माणुसकीचं बँकिंग थेट वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर पोहोचतं!

💐 “सागरजी, तुमचं आयुष्य सदैव आनंदानं, आरोग्यानं, आणि यशानं फुलावं,
तुमचं कार्य हजारो लोकांसाठी प्रेरणादायी ठरावं… हीच वाढदिवसाच्या शुभेच्छांची मनापासूनची भेट!” 

Post a Comment

0 Comments