Ticker

6/recent/ticker-posts

“हसतमुख चेहऱ्यामागे असलेली समाजसेवेची भूमिका…”


हसतमुख चेहरा... आणि समाजसेवेचं खरं नेतृत्व !"भूमिका मुळे

मंगरूळपीरची उर्जामयी, कणखर आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या


— मंगरूळपीरच्या सामाजिक कार्यकर्त्या भूमिका मुळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सदैव हसतमुख, प्रसन्न चेहरा, माणसांना आपलेपणाने जोडणारी वाणी आणि संकटातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद – हीच ओळख आहे भूमिका मुळे यांची. मंगरूळपीरच्या मातीत जन्मलेली ही समाजसेविका आज समाजासाठी आशेचा किरण बनून उभी आहे.

भूमिका मुळे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतरांच्या हितासाठी वाहिलं आहे. सामाजिक प्रश्न असोत, महिला हक्कांबाबत जागरूकता असो, की कुणी गरजू विद्यार्थ्याला शालेय साहित्य द्यायचं काम – त्या प्रत्येक ठिकाणी निःस्वार्थपणे उपस्थित राहिल्या.

त्यांची समाजसेवा ही कुठल्याही प्रसिद्धीच्या झगमगाटापलीकडची आहे.
त्या सगळ्यांचं ऐकतात, समजून घेतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. गरजूंसाठी त्या नेहमी धावून जातात. त्यांच्या डोळ्यांत मायेचा उबदारपणा आहे, तर त्यांच्या कामात प्रामाणिक प्रयत्नांची झलक आहे.

"हसत-हसत समाजात बदल घडवता येतो" हे त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे.

शासन योजना असोत, शाळा-महाविद्यालयीन उपक्रम, महिला बचतगट, अपंग व वृद्धांची मदत, आरोग्य जनजागृती – हे सगळं त्यांचं कार्यक्षेत्र आहे. परंतु त्यांची खरी ताकद म्हणजे त्यांचा संयम, सौम्य स्वभाव आणि न थकणारी सेवा वृत्ती.


🌾 "भूमिका मुळे – लोकशक्तीची ठिणगी" 🌾

सत्तेच्या गदारोळात, शांतपणे चालते,
विकासाचं स्वप्न मनाशी धरून लढते।
ना बॅनर, ना माईक, ना जाहिरातबाजी,
भूमिका मुळे चालवते, जनतेची खरी राजकीय सर्जरी।

जनतेच्या पायात चिखल, आणि नेत्यानं चढलेलं हेलिकॉप्टर,
यात फरक ओळखून, त्या बनल्या गावासाठी वीजेचा ट्रान्सफॉर्मर।
हातात नाही सत्ता, पण शब्दात धार आहे,
मनात नाही घबराट, कारण नजरेत विचार आहे।

महिलांना दिला स्वाभिमानाचा आरसा,
तर तरुणांना शिकवलं प्रश्न विचारायचा धडा खराखुरा।
घड्याळं, कमळ, पंजा यांच्यापलीकडे,
त्यांचं नाव घेतलं जातं जनतेच्या मर्जीवर ठामपणे।



"तुमचं कार्य हेच तुमचं राजकारण राहो,
जनतेच्या प्रश्नांना तुमचं उत्तर लाभो!"


🌸 आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त... 🌸
भूमिका मुळे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा!
तुमचं हसणं असंच टिकून राहो,
तुमचं कार्य अधिक विस्तारो,
आणि तुमच्या समाजकार्याने वाशिम जिल्हा सह मंगरूळपीर तालुक्यातही  समाधान आणि सजगतेच्या वाटेवर वाटचाल ,
हीच प्रार्थना!

–सुधाकर चौधरी 

संपादक ‘वाशिम खबर आवाज महाराष्ट्र’ परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉


Post a Comment

0 Comments