Ticker

6/recent/ticker-posts

"शिक्षणचं मंदिर की भ्रष्टाचाराचं अड्डं?" — वाशिम जिल्हा परिषद व अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा काळा कारभार चव्हाट्यावर!


✍️  किशोर देशमुख मुंबई प्रतिनिधी

वाशिम, ता. ६ जुलै –
"शिकवणाऱ्यांनीच जर फसवणूक केली, तर शिकणाऱ्याचं काय होणार?" असा खडा सवाल आज वाशिम जिल्हा परिषद व अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कारभारावर उपस्थित होतो आहे. कारण, माहितीच्या अधिकारातून मागवलेली शेकडो अर्जांची माहिती अनेक वर्षांपासून लपवून ठेवली जात असून, या दोन्ही कार्यालयात भ्रष्टाचाराचा विळखा इतका घट्ट आहे की सामान्य जनतेचं न् पत्रकारांचंही तोंड बंद ठेवण्याचा आटापिटा सुरू आहे.

कळस म्हणजे माध्यमिक शिक्षण विभागाने थेट ‘मागितलेल्या माहितीचा बोध होत नाही’ असं उत्तर देत मुंबईतील आमचे प्रतिनिधी किशोर देशमुख यांना थेट झिडकारलं. माहिती अधिकार कायद्याच्या पायावर पाय ठेवत, "जाहीर माहिती देण्याऐवजी आम्ही डोळेझाकच करणार" असा जणू ठरलेला धोशा ही मंडळी घेऊन फिरत आहेत.


‘फाईल नाही’, ‘वर दिलंय’, ‘बघतोय’ – भ्रष्ट अधिकाऱ्यांची ढोंगी ढाल

गेल्या १०-१२ वर्षांत शिक्षण विभागात तक्रारींचा पूर आलाय. पण कार्यवाही? शून्य!
"फाईल वर आहे", "बैठकीत घेऊ", "माहिती शोधतोय" – ही सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची ढोंगी ढाल बनलीय. हजारो तक्रारी रद्दीमध्ये ढकलण्यात आल्या, आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासकीय संरक्षणाचं झाकण घातलं गेलं.
किशोर देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत सांगितलं — "शासनाने आता झोपेतून उठून कारवाईची झड उडवावी, अन्यथा जनतेचा उद्रेक अनिवार्य आहे!"


वाशिमच्या बनावट भरतीचा महाघोटाळा — नागपूरच्या धर्तीवर ‘स्पेशल चौकशी’ची जोरदार मागणी

राज्यभर गाजलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याचा थेट धक्का आता वाशिमला बसतो आहे.
येथील शाळांमध्ये बोगस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याच्या तक्रारींचा मोठा डोंगर उभा आहे. कोणत्याही पारदर्शक प्रक्रियेविना, धनदांडग्यांनी लाखो रुपयांचे व्यवहार करून जागा मिळवल्या आणि खरे पात्र उमेदवार पाय चोळत राहिले.

देशमुख यांनी स्पष्ट केलं – "मुख्यमंत्र्यांनी नागपूरप्रमाणेच वाशिममध्येही स्वतंत्र चौकशी सुरू करावी आणि या महाघोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाई व्हावी."
हे प्रकरण विधीमंडळाच्या अधिवेशनातही मांडलं जाणार असून, संपूर्ण शिक्षण खातं हादरवणारी माहिती लवकरच बाहेर येणार असल्याचे सुत्रांकडून कळते.


शिक्षण खातं की भ्रष्टाचाराचं महासिंधू?

एका बाजूला सरकार ‘शिक्षण हे सर्वोच्च’ अशा घोषणा करतंय, आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण खातं हेच भ्रष्टाचाराचं महासिंधू झालंय.
अभ्यासाऐवजी आकडेमोड, कर्तृत्वाऐवजी खंडणी, आणि पात्रतेऐवजी पैसा या तत्त्वावर जर भरती होणार असेल, तर भविष्यात हेच शिक्षक कोणते मूल्य शिकवणार?


📢 "जिल्हा परिषद शिक्षण विभाग, अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालय, माहिती अधिकाराची पायमल्ली, आणि बनावट भरतीचे रॅकेट – या सर्वांची आता सखोल चौकशी करून, दोषींना तुरुंगात धाडा!" – वाशिम खबर आवाज महाराष्ट्रची ठाम भूमिका.


🔥 "आता पुरे झालं! शिक्षण विभागातला दलदल साफ केल्याशिवाय न थांबता आम्ही लढत राहू!" – वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे 


Post a Comment

0 Comments