Ticker

6/recent/ticker-posts

जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था व साऊ एकल महिला समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न


मंगरूळनाथ (प्रतिनिधी) –
आज दिनांक २० जुलै २०२५ रोजी शनि मंदिर संस्थान, मंगरूळनाथ येथे जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था आणि साऊ एकल महिला समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांच्या मुलांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.



या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार श्यामभाऊ खोडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम चितलागे, माजी उपाध्यक्ष डॉ. दिलीप रत्नपारखी, नगर संघचालक श्री. किशोर घोडचर, शनि मंदिर संस्थान अध्यक्ष श्री. सुरेश सोनोने, ग्राहक पंचायत मार्गदर्शक उमेश नावंदर, तसेच बंडू भगत, पूजा खोडे आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा सौ. अश्विनी राम औताडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकही सौ. औताडे यांनी केले, तर सुत्रसंचालन प्रमोद घोडचर यांनी केले.

यावेळी आमदार श्यामभाऊ खोडे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचे कौतुक करत नेहमी सहकार्याचे आश्वासन दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलागे यांनी “सहकार्य आणि साथ कधीही हाक द्या, मिळेलच,” असे सांगत संस्थेला पाठिंबा दर्शविला.
उमेश नावंदर यांनी प्रेरणा घेऊन तात्काळ दोन विद्यार्थी दत्तक घेत त्यांना अर्थसहाय्यही दिले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करत, सौ. औताडे यांच्या एकल महिलांसाठी, त्यांच्यासाठी आणि अनाथ मुलांसाठी चालणाऱ्या कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गेल्या सहा वर्षांपासून मंगरूळनाथसह वाशिम जिल्ह्यात संस्था निःस्वार्थ सेवा करत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती भुतडा, उषा बोले, प्रतिभा गावंडे, सौ. सीमा बंगाले, रेणुका राऊत यांनी विशेष मेहनत घेतली.
एकल महिलांचे व त्यांच्या पाल्यांचे चेहेऱ्यावरचे समाधान आणि आनंद, शालेय साहित्य प्राप्त होताच, कार्यक्रमाचे खरे यश अधोरेखित करून गेले.

हा आगळावेगळा उपक्रम संपूर्ण शहरात कौतुकास्पद ठरला आहे.


संपादक – वाशिम खबर आवाज महाराष्ट्र
(सुधाकर चौधरी )

Post a Comment

0 Comments