राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध धार्मिक सण आणि उत्सवांकरीता सुट्ट्या जाहीर करण्यात येत असतात. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
सण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्ट्या घोषित केल्या आहेत. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले वर्ग बंद राहतील.
0 Comments