Ticker

6/recent/ticker-posts

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस नाही, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी घोषणा स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज भवनावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. 

संध्याकाळी शपथविधी
एकनाथ शिंदे हे आता थोड्याच वेळात संध्याकाळी राजभवनात राज्याचे 20 वे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची माहिती फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे शपथ घेणार असल्याचं म्हटलं जात होतं.

एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
"राज्याचा विकास हे मुख्य उदिष्ट असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेणार आहे. महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments