मंगरूळपीर :
शनिवारी मुंबई येथे संपन्न झालेल्या भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मा . ना .देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या जन्मदिवशी बुके न देता महाराष्ट्रामध्ये सततच्या होत असलेल्या पावसामुळे ओला दुष्काळासारखी परिस्थिती दिसून येत आहे येणाऱ्या पुढील संकटाचे गांभीर्य ओळखून पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पूरग्रस्त कोष फंडाला मंगरूळपीर चे महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे यांनी 51 हजार रुपयांचा धनादेश मा . ना .देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला .यावेळी भाजपा वाशिम जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी ,राजू पाटील राजे, सुनील राजे, नितीन कुलकर्णी ,सुमित वानखडे हे मान्यवर उपस्थित होते.
चितलांगे इंण्डेन गॅस च्या वतीने वर्षभर सतत राबवित असलेल्या विविध उपक्रमाचेही मा .देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले . तसेच वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टी बाबत भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी व पुरुषोत्तम चितलांगे भाजपा कार्यकारणी महाराष्ट प्रदेश सदस्य यांनी माहीती दिली .
0 Comments