Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर येथे कारगील युद्धातील शहिदांना मानवंदना

मंगरूळपीर:-  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटीका परिसरामध्ये २६ जुलै रोजी १९९९ च्या कारगील युद्धा मध्ये  शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली. हा कार्यक्रम माजी सैनीक संघटना च्या वतीने आयोजीत केला होता. यावेळी कारगील युद्धात आघाडीवर लढाई लढलेले नंदकिशोर मनवर यांनी मान्यवरांच्या ऊपस्थीतीत शहीद हुतात्मा स्मारकास सलामी दिली.
      कारगील युद्ध हे ३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९ दरम्यान तब्बल ८५ दिवस चालले होते. या झालेल्या तुंबळ युद्धा मध्ये  देशातील अनेक जवानांनी प्राणाची आहुती दिली. त्यांना माजी सैनिक संघटना मंगरूळपीर व मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली. देशाच्या सीमेवर लढणारा शूर वीर जवान हा खरा देशभक्त असून तो आपल्या जीवाची पर्वा न करता व कुटुंबाला कोसो दूर ठेवून देशाच्या सीमेवर खडा पहारा देत असताना अचानकपणे झालेल्या युद्धात त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामूळे २६ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसरामध्ये शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी तालुक्यातील माजी सैनिकांनी तसेच देशप्रेमींनी मोठ्या संख्येने ऊपस्थीती दर्शवीली.
      या कार्यक्रमास नंदकिशोर मनवर, मोहन जमनिक सुनील मालपानी, राहुलदेव मनवर,रमेश मुंजे,  वसंत ढगे, रमेश चौधरी, अशोक चौधरी, भीमराव मानमोडे, पराशराम अंभोरे, प्रकाश पडघान, विजय इंगोले, नरेंद्र इंगोले, ज्ञानेश्वर गांजरे, सुरेश विटकरे, सुखदेव काजळे, नरहरी खडसे, निरंजन खाडे, नरहरी भगत, शिवाजी इंगोले, हुकुमचंद भगत, महादेव इंगोले, दिनकर कांबळे, भीमराव मनवर, किसन भगत, सुधाकर इंगोले, हरिष भगत,रतन कांबळे, रतन खडसे, शिवाजी खोंडे ,सुधाकर अर्जुने, एस एल भगत,  कारगील युद्धात शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहीली. या दिवशी सतत पाऊस सुरूच असल्याने  कार्यक्रम यशस्वी झाला असून यावेळी मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले व   कारगील लढाई मध्ये जीवाची बाजी करून सीमेवर लढाई लढलेले नंदकिशोर मनवर यांचा मान्यवरांनी पुष्प देवून सत्कार केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली व शहिदांना दोन मिनिट मौन बाळगून  श्रद्धांजली देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी माजी सैनिक संघटना मंगरूळपीर यांनी  अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments