कृषी विभागाचे शेतकऱ्यावर
पुतना प्रेम
मंगरूळपीर तालुक्यातील
शिवारात शेतकऱ्याचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकावर आधी रसशोषक कीड ,तर आता गुलाबी बोंड अळी मुळे पांढऱ्या सोन्याची चमक गडप झाली आहे .सोयाबीन उत्पादनात कमालीची घट झाली आणि आता कपाशीवर फुटण्याच्या अवस्थेत असताना
बोंडसळ होत असून काही शेतात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे.त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची चिन्हे दिसत आहे. यासाठी कृषि विभाामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असते.मात्र शेतकऱ्यावर कृषी विभागाचे प्रेम नसून प्रत्येक्षात पुतना प्रेम दिसून येत आहे.
दरवर्षी कपाशीवर येणारी बोंड अळी यंदा लवकरच आल्याने या अळीचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.या अळीच्या वाढत्या प्रकोपामुळे कपाशी पीक धोक्यात येऊन शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे.परिसरात अळीचे व्यवस्थापन करण्यात शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.कासोळा येथे काही शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे उत्पादन खूपच कमी झाल्याने शेतीला लागणारा खर्च ही निघाला नाही.त्यांची भिस्त कपाशी या पिकावर अवलंबून होती , परंतू कपाशीवर आलेली विविध प्रकारच्या बोंड अळी,रसशोषक किड, व बोंड सळ,मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. कीटनाशकांच्या फवारण्या वाढविल्या असल्या तरी रोग नियंत्रणात येत नसल्याने कापसाच्या उत्पादनात प्रचंड मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी विभागाचे दुर्लक्षआता कपाशीवर विविध प्रकारच्या बोंड अळी रसशोषक किडीं बोंड सळ, मोठ्या संख्येने होत आहे, यापूर्वी हीं सोयाबीन पिकावर मोझक सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता.मात्र कृषी विभागाचे अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले नाही.मार्गदर्शन मिळते ते गावातील फळबाग लागवड करणाऱ्या ,आणि काही ठराविक शेतकऱ्यांना,सामान्य शेतकरी मात्र कृषी विभागाच्या मार्गदर्शना पासून वंचित असल्याने सामान्य शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे शेतकऱ्याच्या हातून सोयाबीन सारखे नगदी पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांची भिंतही कपाशीवर अवलंबून होती विविध प्रकारच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचा ही सत्यानाश झाला आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येत भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही
0 Comments