Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुक्यासाठी रूग्नवाहिका.

(ॲम्बुलन्स) द्यावी व तालुक्यात अपंग. दिव्यांगासाठी भव्य दिव्यांग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे 

शेख नवेद वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख मंगरूळपीर यानी वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांना निवेदन 

मंगरूळपीर.दि.10 ऑगस्ट रोजी 
आरोग्य वारी आपल्या दारी
 हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये हा उपक्रम चालू आहे आज वाशिम येथे पत्रकार परिषद घेण्यात आली असता या निमित्त. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमूख  रामहरी भीमराव राऊत साहेब निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. निवेदन नमूद आहे की मंगरूळपीर तालुक्यासाठी रूग्नवाहिका.(ॲम्बुलन्स) द्यावी आणि तालुक्यात अपंग दिव्यांगासाठी विविध आजाराने ग्रस्त आहे त्याकरिता भव्य दिव्यांग आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यांना उपचारासाठी विविध सोयी व साहित्य उपलब्ध करून देण्यात यावी. वाशिम जिल्ह्यातील हे मंगरूळपीर तालुक्याचे ठिकाण असून येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी चे पदे रिक्त असून गावाच्या नागरिकांसाठी आरोग्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया. गर्भवती. महिलांसाठी हे सुविधा असणे फार गरजेचे आहे. या करिता ॲम्बुलन्स असणे फार गरजेचे आहे ... शिवसेना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून रुग्णवाहिका देण्यात यावी व मंगरूळपिर तालुक्यात अपंग दिव्यांगांसाठी विविध आजाराने ग्रस्त आहे त्यांच्या करिता विशेष दिव्यांग आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यांना उपचार करून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.या वेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्कप्रमुख , वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख, आजी माझी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments