श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा (खुर्द )येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रीमती रजनीताई धानोरकर यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले
त्यानंतर भारताचे राष्ट्रगीत ,राज्य गीत ,प्रतिज्ञा व संविधान घेण्यात आले व समोर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त संस्थेच्या कोषाध्यक्ष श्रीमती रजनीताई धानोरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले व धानोरा ग्राम चे प्रतिष्ठित नागरिक व तसेच संस्थेचे प्राचार्य तथा सचिव श्री मंगेश भाऊ धानोरकर यांनी प्रमुख अतिथींचे स्थान स्वीकारले. अध्यक्ष,उपाध्यक्ष तथा प्रतिष्ठित नागरिक यांना वृक्ष व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले सत्र 2023 -2024 या वर्ग 10व 12 वी मध्ये प्रथम येणारे विद्यार्थि त्यांच्या पालकासह शाल ,श्रीफळ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयामध्ये घेण्यात येणाऱ्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुण गौरव करण्यात आला 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारक व समाज सुधारक यांच्या वेशभूषा साकारल्या व देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रजनीताई धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये शिक्षक व पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थी धानोरा ग्रामचे प्रतिष्ठित नागरिक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री ढेगळे सर यांनी केले तर आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री उचित सर यांनी मानले
0 Comments