Ticker

6/recent/ticker-posts

बुद्ध प्रतिष्ठान, वाशी, नवी मुंबई चे अध्यक्ष डॉ. अनंत हर्षवर्धन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

खरंतर यांच्या बद्दल काय लिहावं आणि किती लिहावा हा मला पडलेला प्रश्न आहे . हल्लीच्या काळात पाहिलं तर धम्म चळवळीच्या माध्यमातून आपल्या बौद्ध बांधवांची प्रगती होत आहे. डॉ. बाबासाहेब आंंबेेकर यांनी आपणास बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर आपण  त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करित असल्यामुळे समाज न भूतो न भविष्यति प्रगती करत आहे. हेच सूत्र लक्षात घेऊन डॉ.अनंत हर्षवर्धन यांनी बुद्ध प्रतिष्ठानच्या माध्यमातून बौद्ध समाजाची सेवा करण्याचे मनोमन ठरवले आणि बुद्ध प्रतिष्ठानच्या सभासदांनी त्यांच्यावर विश्वास प्रस्थापित केला आणि त्याना बुद्ध प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष बनविले. त्यांच्यासमोर हे एक फार मोठे आव्हान होते. एका बाजूने बुद्ध प्रतिष्ठानच्या इमारतीची उभारणी करणे व शासनाकडून त्यासाठी ओसी (o.c.) प्राप्त करणे आणि दुसऱ्या बाजूने कार्यक्रम राबवत असताना सामाजिक आणि धार्मिक सांगड घालून ते कार्य कसं पुढे न्यायचं ? हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. येथे त्यांनी आपला अनुभव आणि कार्य कौशल्य पणाला लावले आणि आपल्या दूरदृष्टी कार्यप्रणालीतून त्यांनी बुद्ध प्रतिष्ठानला प्रगतीपथावर नेले. बुद्ध प्रतिष्ठानची ख्याती नवी मुंबई मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. नवी मुंबईतील प्रेक्षणिय स्थळांमध्ये बुद्ध प्रतिष्ठानची नोंद झाली आहे. त्याला कारण त्यांचा मोठ्या प्रमाणात असलेला जनसंपर्क आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांचे असलेले घनिष्ठ संबंध व प्रेमळ स्वभाव यातून त्यांनी बुद्ध प्रतिष्ठान प्रगती पथावर नेण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले हे आपणा सर्वांना माहित आहे,ज्ञात आहे.
   
आपले बुद्ध प्रतिष्ठान हे आता धम्मिक चळवळीचे फार मोठे केंद्र झाले असून ह्या केंद्राच्या माध्यमातून अनेक धम्मीक विचारवंत, आदरणीय भंतेगण धम्मावर विशेष अभ्यास असणारे विचारवंत व अनेक तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याचा लाभ अनेक धम्म बांधवांना मिळाला आहे, मिळत आहे. परमपूज्य  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या भाषणात सांगितले की "मी हा रथ येथ  पर्यंत  आणला आहे, त्याला जरी पुढे नेता येत नसेल तरी हरकत नाही परंतु त्याला मागे नेऊ नका" असं कळकळीच आव्हान केलं. तो विचार मनात ठेऊन डॉ. हर्षवर्धन यांनी धम्म चळवळीमध्ये उडी मारली आणि येईल त्या प्रसंगाला सामोरे जात धम्म चळवळीला पुढेच नेण्याचा संकल्प ठेवून निष्ठेने काम करून ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे  कार्य सातत्याने करीत आहेत, आपले विहार, आपली संस्था नीटनेटकी व शिस्तबद्ध चालावी यासाठी  त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असुन रोज आपल्या सहकार्यासह पाच ते सहा तास काम करत असतात. दर पंधरा दिवसातून ते आपण ठरविलेल्या कार्याचा गोषवारा मीटिंगच्या माध्यमातून घेत असतात. परिणामी प्रत्येक कार्यकारणीतील सभासद जबाबदारीने काम करताना आढळतो. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी आपली जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडली. त्यांना प्रशासकीय कार्याचा दांडगा अनुभव असून त्याचा उपयोग ते बुद्ध प्रतिष्ठान साठी करीत असतात
    बुद्ध प्रतिष्ठान संस्थेचं कार्य करण्याची पद्धत पाहून अनेक कंपन्यातील वेल्फर असोसिएशन तसेच महाराष्ट्र शासन समाज कल्याण आपल्या संस्थेस् मदत करण्यासाठी आनंदाने पुढे येत आहे हे आपल्या संस्थेला फार मोठं प्रशस्तीपत्र असून त्याचे लाभार्थी जरी आपण असलो, परंतु त्याचे श्रेय हे संपूर्णपणे डॉ अनंत हर्षवर्धन यांनाच जातं.

 विहाराची बांधणी व अंतर्गत सजावट व धम्मासाठी केलेली योजना, या सर्व गोष्टींसाठी डॉ.अनंत हर्षवर्धन हे सतत कार्यरत राहून झटत असतात. 
पुन्हा एकदा तुमच्या  वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा , खरंच अशी माणसं आयुष्यात खूप खूप जगली पाहिजे त्यांच्या कडून बोध घेऊन बाकी माणसं वागली पाहिजे .
डॉ.अनंत हर्षवर्धन साहेब
सुख समाधानी आयुष्य लाभो हीच आमची इच्छा आहे वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहे !!!

Post a Comment

0 Comments