मंगरुळनाथ:--
बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारा विरोधात
मंगरुळनाथ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने दि.२५ आगस्ट रोजी निषेध मोर्चा ' काढण्यात आला. मोर्चाच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.सकाळ पासुन दुपारी १वाजेपर्यंत दुकानदारांनी आपापली दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवली. व निषेध मोर्चात सहभागी झाले. मोर्चा मध्ये हजारो चे वर सकल हिंदु नागरिकांनी सहभाग नोंदविला.
हा निषेध मोर्चा श्री चारभुजानाथ मंदीर,देवकी भवन पासुन काढण्यात आला.सुभाष चौक,संत बिरबलनाथ महाराज चौक,छत्रपती शिवाजी
महाराज चौक,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक विर भगतसींग चौक मार्गे महाराणा प्रताप चौक येथे समारोप करण्यात आला.दुर्गावाहीनी मुलींच्या
हस्ते ठाणेदार सुधाकर आडे यांना नागरिकांच्या स्वाक्षर्या असलेले निवेदन देण्यात आले.त्या वेळी हिंसाचारात शहीद झालेल्या हिंदुंना
श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चाचे संयोजक आयोजक यांनी यावेळी "वंदे मातरम" राष्ट्रगीताणें कार्यक्रमाची सांगता केली.
0 Comments