Ticker

6/recent/ticker-posts

समाज भूषण मा. सतिशभाऊ उत्तमराव हिवरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 


मंगरूळनाथ – कुशल संघटक, समाजसेवेचे निस्वार्थ व्रती, राष्ट्रवादाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अखंड सेवा देणारे, भाजप वाशिम जिल्हा उपाध्यक्ष तसेच गौ-भक्त म्हणून ओळख निर्माण करणारे, धर्मध्वजा अलंकृत माननीय सतिशभाऊ उत्तमराव हिवरकर यांचा आज, २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस!

सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘समाज भूषण’ म्हणून गौरवले जाते. अनेक वर्षांपासून त्यांनी वाशिम जिल्ह्यात समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना दिली असून, संघटन कौशल्य, नेतृत्वगुण, आणि सुसंस्कृत राजकारणाचे प्रतीक म्हणून ते परिचित आहेत.

गौसेवा, धर्मरक्षण आणि राष्ट्रसेवा या त्रिसूत्रीवर आधारलेली त्यांची कार्यपद्धती समाजातील अनेकांना प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, वाशिम जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वाशिम खबर आवाज महाराष्ट्र चे संपादक सुधाकर चौधरी यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटले –

"सतिशभाऊंना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून अखंड राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि गौसेवा घडत राहो. त्यांचे संकल्प व मनोकामना 'कामधेनु' प्रमाणे पूर्ण होवोत, हीच आमची प्रार्थना!"

समाजहितासाठी झटणाऱ्या अशा नेतृत्वाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!


Post a Comment

0 Comments