Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी महामार्गावर गोवंश तस्करीचा मोठा पर्दाफाश; रुक्मिणी माऊलींचा संताप, प्रशासनाला थेट इशारा


जखमी अवस्थेत आढळलेला गोवंश उपचारानंतर सुरक्षित स्थळी हलविण्यात आला.

वाशिम, प्रतिनिधी — समृद्धी महामार्गावर आज पहाटे उघडकीस आलेल्या गोवंश तस्करीच्या प्रकरणामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. बजरंग दलाच्या गोरक्षक कार्यकर्त्यांनी संशयित वाहनाचा थरारक पाठलाग करून गोवंशाची सुटका केली. मंगरूळनाथ पोलीस स्टेशनमार्फत संबंधित गोवंश चैतन्य गोशाळा, वाशिम येथे सुपूर्द करण्यात आला.



मंगरूळनाथ, मानोरा, कारंजा आणि वाशिम परिसरात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. मुख्य चौकांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने तस्करांना मोकळे रान मिळत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या संपूर्ण कारवाईत रुक्मिणी माऊली अग्रस्थानी होत्या. संशयित वाहनाचा पाठलाग करताना रुक्मिणी माऊलींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गोवंश सुरक्षितपणे पोलीस ताब्यात देईपर्यंत रुक्मिणी माऊली घटनास्थळी ठामपणे उभ्या राहिल्या. संपूर्ण कारवाईदरम्यान रुक्मिणी माऊलींची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.

नाथ नगरीचे सतीश भाऊ हिवरकर यांनी प्रशासनावर थेट शब्दांत टीका करत म्हटले,
“जर जिल्ह्यात गोवंश तस्करी सुरूच राहणार असेल तर प्रशासनाने स्पष्ट सांगावे. आम्ही शांत बसणारे नाही. कायद्याच्या चौकटीत राहून तीव्र जनआंदोलन उभारू. दोषींना तात्काळ अटक झाली नाही तर हा विषय जिल्हाभर पेटेल.”

रुक्मिणी माऊली यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत इशारा दिला,
“गोमातेवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तस्करावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा, पोलिसांनी गस्त वाढवा आणि संपूर्ण रॅकेट उघड करा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करू.”

बजरंग दल गोरक्षक वाशिम प्रथमेश सुळे , महेश इंगळे,  विनोद वानखेडे, ज्ञानेश्वर परांडे, गोविंद नवघरे, महादेव मुठाळ यांच्यासह रुक्मिणी माऊली यांनी जीव धोक्यात घालून गोवंशाची सुटका केली. रुक्मिणी माऊलींच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही कारवाई जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, पोलीस स्टेशन येथे त्वरित उपस्थित राहून डॉ. सागर सोनटक्के, डॉ. जानराव पहुरकर आणि डॉ. पल्लवी जाधव यांनी जखमी गोवंशावर उपचार केले. त्यांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

घटनेमुळे वाशिम जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलून गोवंश तस्करीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा जनतेचा रोष अनावर होण्याची चिन्हे दिसत आहेत.



— बजरंग दल गोरक्षक, वाशिम

Post a Comment

0 Comments