Ticker

6/recent/ticker-posts

NCMC कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


राजस्थानी महिला संघटनेच्या पुढाकारातून ४५ नागरिकांचे कार्ड तयार

मंगरूळनाथ : नागरिकांना NCMC कार्ड नोंदणीची सुविधा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राजस्थानी महिला संघटना, मंगरूळनाथ यांच्या वतीने तसेच डेपो मॅनेजर यांच्या संमतीने आयोजित करण्यात आलेल्या NCMC कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरादरम्यान एकूण ४५ नागरिकांचे NCMC कार्ड तयार करण्यात आले.

स्थानिक नागरिकांना NCMC कार्ड नोंदणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी नोंदणीसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सौ. सुरेखा बाहेती, सौ. भूमिका बियाणी, विद्या असावा, करुणा बाहेती, रश्मी भुतडा, वैष्णवी शर्मा, सुनीता जाखोटिया, राधा तिवारी, शारदा भुतडा, वर्षा बाहेती, कविता बाहेती, अनुराधा राठी, मीना राठी, अर्चना बियाणी, कृष्णा बजाज व अभिजित भुतडा यांनी मोलाचे सहकार्य केले.

याशिवाय, आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून शिबिरात सहभागी होत NCMC कार्ड बनवून घेण्यासाठी आलेले अतुल काथळे व सौ. मनीषा काथळे यांचेही विशेष सहकार्य लाभले.

नागरिकांना आवश्यक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे राजस्थानी महिला संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच सहभागी नागरिकांचे राजस्थानी महिला संघटना, मंगरूळनाथ यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.



Post a Comment

0 Comments