Ticker

6/recent/ticker-posts

भाजप सेनेची गेली २५ वर्षांची युती खऱ्या अर्थाने आज तुटली. आता भाजप कशी सेने ला संपवायचे राजकारण करत आहे ते बघा

*ग्यानबाची मेख.....*


१) मागची १५-२० वर्षे सोडल्यास  भाजपला जेc यश मिळाले त्यात शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे. शिवसेना जेव्हा महाराष्ट्रात खूप जोमात होती तेव्हा एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपला देखील पुढे आणण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. भाजप सशक्त झाल्यावर पुढे हळूहळू शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करेल हि शंका सुध्दा शिवसेनेला तेव्हां आली नाही.

२)युती तुटून हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊन नये म्हणून शिवसेनेने अनेक वेळा दोन पावलं माघार घेऊन भाजपला जे हवं ते मान्य केले.

३) १९९९ साली शिवसेनेला ६९ व भाजपला ५६ जागा मिळून १२५ जागा + ६ अपक्षांचा पाठिंबा म्हणजे आवश्यक बहुमतापेक्षा जास्त जागा मिळूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले. याचे कारण भाजपला शिवसेनेच्या हाती मुख्यमंत्रीपद  द्यायचे नव्हते. गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे असा हट्ट करत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यात मदत केली. शिवसेनेला तेव्हां पहिल्यांदा लक्षात आले कि युतीचे सरकार स्थापन करण्यापेक्षा शिवसेनेला संपवून तिचे स्थान पटकावणे हे भाजपचे पहिले उद्दिष्ट आहे. भाजपने हा विश्वासघात करून सुध्दा दोन्ही पक्षांची मते फुटून त्याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळू नये यासाठी बाळासाहेब ठाकरे हे प्रमोद महाजनांच्या सांगण्यावरून युती करत राहिले.

४) आज एन डि ए मधे भाजप सारखा दुसरा हिंदुत्ववादी पक्ष फक्त शिवसेनाच आहे. अन्य पक्षांचे बहुसंख्य मतदार हिंदुत्ववादी नाही. त्यामुळे त्या पक्षांचा पाठिंबा मिळवणे शक्य असले तरी त्या पक्षाला मिळणाऱ्या जागा भाजपला मिळणे कठिण जाणार याची कल्पना भाजपला आहे. शिवसेनेच्या बाबतीत असे नाही. शिवसेना संपली कि त्याचे मतदार भाजपलाच मिळणार असल्यामुळे शिवसेनेला संपवणे हा भाजपचा पहिला प्रयत्न आहे.

५) भाजपचा इतिहास पाहता एखाद्या राज्यात शिरकाव करण्यासाठी तिथल्या एका मजबूत प्रादेशिक पक्षाशी युती करायची व हळूहळू त्या पक्षाला काही कळायच्या आधीच संपवून तिथे आपले स्थान भक्कम करायचे. गोव्यातील मगो पक्षाचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. नितिशकुमार, नविन पटनायक, चंद्राबाबू नायडू  हे वेळीच सावध झाल्यामुळे त्यांचे पक्ष जिवंत राहू शकले.

६) केंद्रात सुध्दा शिवसेनेला कसलेच काम करायची संधी न देता खच्चीकरण करून संपवण्याचे कारस्थान भाजप सत्तेवर आल्यापासुन करत आलेला आहे. २०१४ च्या  लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या जागा १८.  मंत्रीपद १.  ते सुध्दा अवजड उद्योग मंत्रीपद. ज्या खात्याला फारसे काहीच काम नाही.

अपना दल पक्ष- खासदार २. मंत्रीपद १.
जनता दल युनायटेड- खासदार १६. मंत्रीपद २.
लोक जनशक्ती पक्ष- खासदार ५. मंत्रीपद २.
अकाली दल- खासदार ४. मंत्रीपद २.
अन्य एक पुर्वोतरचा पक्ष ज्याचे नाव विसरलो- खासदार १. मंत्रीपद १.
२०१९च्या लोकसभेतही शिवसेनेचे खासदार १८. मंत्रीपद १. आणि ते सुद्धा मागच्या वेळचेच अवजड उद्योग मंत्रीपद. महत्त्वाचे म्हणजे हे मंत्रीपद सोडून दुसरे चांगले मंत्रीपद देण्यात यावे अशी लिखीत विनंती शिवसेनेने करून सुध्दा तेच खाते देण्यात आले.
हिच बाब महाराष्ट्रात कटाक्षाने पाळण्यात आली. बहुतेक महत्त्वाची मंत्रीपदं भाजपने आपल्याकडे घेत शिवसेनेला मतदारांवर फारसा प्रभाव पाडायची संधी मिळू नये याचीच खबरदारी घेतली.

७) त्यामुळे भाजप सोबत युतीत राहिलो तर हळूहळू भाजप आपल्याला संपवणार याची जाणीव झाल्यावर शिवसेना फक्त संधीची वाट बघत होती. निवडणुकीच्या निकालांनी ती दिल्यावर शिवसेनेने ती संधी सोडली नाही.

 ८) उध्दव ठाकरेने अमित शहांनी समान जागा वाटप व समान मंत्रीपदं व अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मान्य केले होते हे सांगितल्यावर शहांनी मौन बाळगणे, उध्दव ठाकरेला भेटायचे टाळण्यासाठी महाराष्ट्रात पाऊल न ठेवणे यावरून कोण खोटं बोलत आहे याची कल्पना येते. आणि समजा अमित शहांनी तसा शब्द दिलाच नव्हता असे गृहीत धरले तरी  आपल्याच मित्रपक्षाला अर्धवेळ मुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य करून युतीचे सरकार स्थापन करायला काय हरकत होती? म्हणजेच काहीही झाले तरी शिवसेना संपवायची हा एक कलमी कार्यक्रम भाजपचा होता.

९) केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे भाजपला दुखवता कामा नये हे न समजण्या इतकी मुर्ख शिवसेना नक्कीच नाही. पण शेवटी शिवसेनेने जर ठरवले असेल कि भाजप सोबत राहून संपण्यापेक्षा कॉंग्रेस सोबत राहून जगण्यासाठी धडपड करुया तर ते अयोग्य नक्कीच नाही.
हे सगळे वरील मुद्दे वाचल्यावर त्यात बरेच तत्थ असल्याचे मला सुध्दा जाणवले.

   # _शिवसेने परत मागे फिरणं_ ,

            *आत्मघात*                  लेखन-अण्णाभाऊ चौधरी, शिव सेना उपतालुका प्रमुख तथा तालुका संघटक मंगरूळनाथ जिल्हा वाशिम. मो.9922010460.

Post a Comment

0 Comments