Ticker

6/recent/ticker-posts

माउंट आबू शांतिवनात ब्रह्माकुमारी बहिणींचा रक्तदानाचा महायज्ञ – दादींना अनोखी श्रद्धांजली


(वाशिम सुधाकर चौधरी)

माउंट आबू  – ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांतिवन मुख्यालयात यंदा दादींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक अनोखी श्रद्धांजली वाहिली गेली. नेहमीप्रमाणे फुलांनी नव्हे तर रक्तदानाच्या पवित्र कार्यातून या वर्षी बहिणींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. "फुलांपेक्षा जीवनदायी रक्तदानच खरी श्रद्धांजली" या भावनेने हजारो टीचर बहिणी पुढे सरसावत रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे आल्या.

या रक्तदान शिबिराला देशभरातून आलेल्या सेवाभावी बहिणींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. निःस्वार्थ सेवेच्या या महायज्ञात वाशीम सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी स्वाती दीदी यांनीही मधुबन येथे रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.

मानवतेची खरी सेवा म्हणजे इतरांच्या जीवनात आनंद आणि आरोग्य फुलवणे, या तत्वज्ञानाला साजेशी अशी ही अनोखी उपक्रमशीलता सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे.


🙏 "फुले कोमेजतात… पण रक्तदानाने उमललेलं जीवन चिरंतन राहते," अशा शब्दांत दादींना वाहिलेली ही श्रद्धांजली आज सर्वांना प्रेरणा देणारी ठरली. ओम शांती



Post a Comment

0 Comments