अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने, कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली अखंड धरना आंदोलनास प्रारंभ
पटणा / प्रतिनिधी :
बिहारच्या लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास देत, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता पटण्याच्या गर्दनीबागेत अखंड धरना आंदोलनास सुरुवात झाली.
पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या कार्याध्यक्षा कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलनकर्त्यांनी ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील’ असा प्रखर निर्धार व्यक्त केला.
गर्दनीबागेत उसळलेल्या या जनलाटीमुळे प्रशासनाच्या पायाखालची जमीन अक्षरशः हलली. सर्वसामान्यांचे आवाज एकवटले, घोषणा घुमू लागल्या आणि वातावरणात लोकशक्तीचा गडगडाट घुमू लागला.
आंदोलनाच्या ठळक मागण्या —
1️⃣ संयुक्त विकास समितीची स्थापना – पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्ष, तज्ज्ञ व जनता प्रतिनिधींना घेऊन समिती स्थापन करावी.
2️⃣ मतदार यादीतील अन्याय्य वगळण्यांची चौकशी – स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी आयोग स्थापन करून विरोधी पक्षांनाही प्रतिनिधित्व द्यावे.
3️⃣ न्याय आणि पारदर्शकता – आयोगाचा अहवाल त्वरित प्रसिद्ध करून अन्यायाने वगळलेल्या नागरिकांना पुन्हा मतदार यादीत सामील करावे.
गर्दनीबाग हे बिहारमधील जनआंदोलनांचे ऐतिहासिक केंद्र आहे. आज पुन्हा या भूमीतून एक नवा इतिहास घडताना दिसत आहे. आंदोलनकर्त्यांचा आवाज स्पष्ट आहे –
“ही लढाई बिहारच्या सन्मान, विकास आणि लोकशाही हक्कांसाठीची आहे, आणि या लढ्यात राज्यातील प्रत्येक नागरिक आमच्यासोबत असेल.”
0 Comments