बाल व किशोर गटासाठी जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम
माहितीपट दाखविणार : व्हीएसटीएफ व युनिसेफची विशेष मोहीम
वाशीम - महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखा यांच्या वतीने बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंध या विशेष मोहीमेच्या तिसर्या व शेवटच्या टप्प्यात बालदिनाचे औचित्य साधून 14 ते 28 नोव्हेंबर दरम्यान जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभा यांच्यासाठी शैक्षणिक माहितीपटासोबतच या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यांतील 850 गावांमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये चालणार्या या मोहीमेत लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देण्यात येत आहे. बालदिनाचे औचित्य साधत या मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा 14 नोव्हेंबरला सुरु होऊन 28 नोव्हेंबरला संपणार आहे. या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील, गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभा यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जातील आणि असे विवाह रोखण्यासाठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती दिली जाईल. बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल.
या मोहिमेचा पहिला टप्पा 15 ऑगस्टला सुरु झाला. या टप्प्यात अगदी तळागाळातील गावक-याना समस्यांची माहिती दिली व यासाठी ग्रामसभा भरविल्या गेल्या. अशा सभांमध्ये बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचे ठराव संमत केले. तर दुसरा टप्पा 11 ऑक्टोबरला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु झाला. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले गेले. बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेतल्या तसेच बचतगट कार्यकर्त्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली. युनिसेफच्या अधिकार्यांनीही या प्रक्रियेत सहभागी होवून गावकर्यांना बालहक्क रक्षणाप्रती जागृत केले.

0 Comments