समाजातील स्त्री ही फक्त घरापुरती मर्यादित नसते, ती समाजघटक बदलण्याची ताकदही बाळगते, याची जिवंत साक्ष म्हणजे सौ. चंचलताई खिराडे. महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या मूल्यांसाठी ताई गेली अनेक वर्षं अहोरात्र धडपडत आहेत.
गावोगावी महिलांचे संघटन उभं करणं, शोषणाविरोधात आवाज उठवणं, स्वावलंबनाच्या वाटा दाखवणं आणि गरजूंना न्याय मिळवून देणं—या साऱ्या कामातून त्यांनी समाजात ठाम छाप सोडली आहे. चंचलताईंचा स्वभाव साधा, पण निर्धार कणखर. प्रत्येक उपक्रमामध्ये त्या अग्रेसर राहतात. अनेकदा संकटं, विरोध यांना तोंड देत त्या चालत राहतात. समाजहिताची मशाल घेऊन जे लोक झटतात त्यांचा वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस राहत नाही, तर समाजासाठीही अभिमानाचा क्षण ठरतो.
आजच्या धावपळीच्या काळात “महिला सुरक्षेबद्दल फक्त बोललं जातं, पण प्रत्यक्ष कृतीत उतरवणारं धैर्यवान व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ. चंचलताई खिराडे” असं अनेक कार्यकर्त्यांचं मत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक भगिनींना आत्मसन्मानाचं जीवन लाभलं आहे.
वाढदिवसाच्या या शुभक्षणी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम स्वास्थ्य आणि अजून व्यापक कार्यासाठी प्रेरणाशक्ती लाभो, हीच प्रार्थना.
✍️ सुधाकर चौधरी
संपादक
वाशिम खबर आवाज महाराष्ट्र
0 Comments