Ticker

6/recent/ticker-posts

झी २४ तास मधून संदीप साखरे यांनी बारा वर्षानंतर आपले पाऊल कायमचे बाहेर टाकलेआहे

संदीप साखरेचे  झी २४ तास मधून पाऊल बाहेर ...
मुं 'राहा एक पाऊल पुढे' म्हणणाऱ्या झी २४ तास मधून संदीप साखरे यांनी बारा वर्षानंतर आपले पाऊल कायमचे बाहेर टाकले आहे. इनपूट  हेड पदावरू
न हटवण्यात आल्यानंतर डिमोशन झाले म्हणून  इमोशन  होत साखरेनी  राजीनामा दिला आहे.



संदीप साखरे हे झी २४ तास सुरु झाल्यापासून कार्यरत होते. काही वर्षांपासून ते इनपूट हेड पदावर होते.  इनपूटला संदीप साखरे आणि आऊटपूटला विठोबा सावंत ही जोडी फेमस होती. विरोधात जाणाऱ्याचा हे  दोघे मिळून गेम करीत असल्याचा आरोप सातत्याने होत होता. प्रसाद काथे यांची  याच  जोडगोळीने विकेट पाडल्याची चर्चा आहे.



काही दिवसापूर्वी  आशिष जाधव कार्यकारी संपादक म्हणून जॉईन झाले आणि झी २४ तास मध्ये जाधवशाही सुरु झाली. आल्या -आल्या त्यांनी पहिला प्रहार संदीप साखरेवर केला. साखरेला इनपूट हेड पदावर काढून  आऊटपूटला मॉर्निग शिफ्टला पाठवले आणि  इनपूट हेड म्हणून दिल्लीतून  नरेंद्र बंडबेना आयात केले. त्यामुळे संदीप साखरेला मिर्ची लागली. बारा वर्ष काम करून माझं डिमोशन केलं म्हणून इमोशन होत त्यांनी राजीनामा दिला आणि झी २४ तास मधून आपले पाऊल कायमचे बाहेर टाकले.



इकडे जोडीदार गेला  म्हणून विठोबा सावंत अस्वस्थ  झाले आहेत. आपलीही कधीही विकेट पडू शकते म्हणून ते हवालदिल झाले आहेत.  शुगरेनंतर आता काळू मामा,  जोक पाटील, कोल्हापूरी पाटील, ढंकाईकर आपा, चिपाली वर्ल्डताप यांचा नंबर लागणार असल्याची चर्चा झी २४ तास मध्ये सुरु झाली आहे. 

Post a Comment

0 Comments