Ticker

6/recent/ticker-posts

प. स. सभापतीचे गाव पाण्यावाचुन वंचीत व विविध समस्याच्या विळख्यात

 
 नवनीर्माण  फाउंडेशनच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियानास प्रारंभ 
कारंजा प्रतिनिधी दि.२१
नागरीकाच्या आरोग्याची जबाबदारी ही शासनाची असल्याने आरोग्यास कारणीभूत साफ सफाईबाबत वेगवेगळे अभियान देखिल राबविले जातात मात्र हे अभियान राबविण्या मध्ये महत्वाची भूमिका असते ती शासन कर्मचाऱ्यांची मात्र कर्मचारी बेजबाबदार पणे कर्तव्य पार पाडत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना नवनिर्माण फाऊंडेशन कारंजा चे अध्यक्ष श्री अनुप ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण फाऊंडेशनचे संचालकासह कारंजा तालुक्यातील गलीच्छ राजकारणाने घेरलेल्या व विविध समस्याच्या विळख्यात सापडलेल्या  ग्राम किन्ही रोकडे येथुन ग्राम स्वच्छता अभियानाला आज दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी श्रीराम नवमी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सर्व प्रथम श्रीरामाच्या आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अनुप ठाकरे व कारंजा पंचायत समितीच्या सभापती श्रीमती रविनाताई रोकडे आणि ग्राम किन्हीरोकडेच्या सरपंच्या श्रीमती रंत्नाबाई कवळे यांच्या हस्ते करण्यात आले आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताच्या सदस्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि ग्राम स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे सण २०११ पासुन सुरु असलेल्या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये  आशाताई रोकडे, मंदाताई रोकडे, कमलाबाई रोकडे, नर्मदाबाई कदम, लक्ष्मीबाई चव्हाण, मिराबाई रोकडे, शांताबाई घोडके,  सुशिलाबाई रोकडे, कोकीळाबाई गिरी, बेबीबाई कवळे, मुनिफा बी शे. जमिल, आदी महीला तसेच नवनिर्माण  फाऊंडेशनचे संचालक श्री नितीन तायडे, प्रमोद रोकडे, गुलाबराव रोकडे, श्रीकृष्ण रोकडे,अनंता रोकडे, अंकुश अवघन, सचिन रोकडे ग्राम पंचायत कर्मचारी, राहुल सांगऴे यांच्या सहभागाने अभियान राबविण्यात आले. या कार्यकर्त्यांनी ग्राम किन्हीरोकडे येथील रस्ते,नाल्या तसेच शाळा व कार्यालय परिसराची स्वच्छता केली आहे. 


गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी ही ग्राम पंचायतची आहे मात्र या समस्यांवर व पाणी पुरवठ्यावर विशेष लक्ष पुरवित नसल्यामुळे पाण्यावाचुन गावकर्‍याना वण वण भटकावे लागत आहे तरी संबंधितांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी ग्राम किन्हीरोकडेच्या जनतेकडुन यावेळी करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments