Ticker

6/recent/ticker-posts

आमदार श्याम खोडे यांच्यातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिधा भेट!

आमदार श्याम खोडे यांच्यातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिधा भेट; स्नेहभेट कार्यक्रमातून माणुसकीचा संदेश!

मंगरूळनाथ : दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा सण. मात्र शेतकरी आत्महत्येमुळे कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांसाठी हा सण अनेकदा दुःखदायक ठरतो. या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने वाशिम-मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम रामचरण खोडे यांच्या पुढाकारातून ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगरूळनाथ येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी दिवाळी शिधा भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त शिधा भेट देऊन त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आर्थिक आणि कौटुंबिक संकटांचा सामना करणाऱ्या या कुटुंबांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, त्यांच्याही घरी दिवाळीचा आनंद साजरा व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

शेतकरी कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हाच खरा जनसेवेचा उद्देश असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त झाली.

'आपली माणसं, आपली जबाबदारी' हा संदेश देत आमदार श्याम खोडे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments