Ticker

6/recent/ticker-posts

स्कूल बसचे बँकेचे हप्ते वसूलीस स्थगीती द्यावी! मनवर यांचे शासन व रिझर्व बँकेला निवेदन




मंगरूळपीर:- कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक करणार्‍या स्कूल बस मालकांकडून बँकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने वाहनधारक शाळा अथवा गाडी मालक यांना फायनान्स कंपण्या व बँका त्रास देत आहेत. त्यामूळे शाळा सुरू होईपर्यंत हप्ते वसूलीला स्थगीती देण्याकरीता बँकांना निर्देश देण्याच्या मागणीचे निवेदन मेस्टा सदस्य तथा शाळा राहुलदेव मनवर यांनी दि.१० एप्रील रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य स्तरीय बँकर्स समीती पुणे तसेच शालेय शिक्षण मंत्री यांना पाठवीले आहे.
     सामाजीक कार्यकर्ते राहुलदेव मनवर हे महाराष्ट्र स्टेट इंग्लीश स्कुल ट्रष्टीज् असोशीएशनचे (MESTA) सदस्य असून ते एका शाळेचे सचीव असून त्यांचेकडे महींद्रा कंपनीची स्कुल बस आहे. त्यांनी पाठवीलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १४ महिण्यांपासून राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद आहेत. त्यामूळे शाळा बंद असल्याने शाळांकडे व वाहनधारकांकडे विद्यार्थी वाहतूकीसाठी असलेल्या स्कूल बस चे हप्ते थकल्याने प्रायव्हेट फायनान्स वाल्यांनी लाखो रुपये भरलेल्या स्कुल बसेस अक्षरशः ओढून नेल्या व विकल्या आहेत. यामूळे हजारो परिवार बर्बाद झालेले आहेत. तर शाळांच्या ईमारती सुद्धा बँका अथवा फायनांन्स कंपन्यांनी सील केल्या आहेत. आशा परीस्थीतीत शाळा व शाळांवर अवलंबून असलेला विद्यार्थी वाहतूक वाहन धारक मोठ्या संकटात असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर शालेय शिक्षण विभागाने संकीर्ण २०२०-२१/प्र.क्र.३८/ एस एम-५ दि.१६.४.२०२१ ला नियोजन विभागास प्रस्ताव पाठवला असून राज्याचे उपमूख्यमंत्री अजीत पवार यांनी सुद्धा आपल्या अधिनस्त असणार्‍या नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचीव देवाशीश चक्रवर्ती यांना यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा नियोजन विभागास पत्र पाठवीले आहे. याबाबत मनवर यांचेशी चर्चा केली असता त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाची राज्यातील बँकर्स कमीटी पुणे येथील उपमहाप्रबंधक यांचेशी आपण संपर्क साधल्याचे व सदर कार्यालयाने राज्य शासनाकडून तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यास नक्कीच प्राधान्य देवू असे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचेकडे असणारा राज्य शासनाचा नियोजन विभाग लवकरच स्टेट लेवल बँकर्स कमीटी पुणे येथे याबाबतची फाईल पाठवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच शाळा सुरू होईपर्यंत स्कुल बसच्या हप्ते वसूलीला स्थगीती देण्याकरीता बँकांना निर्देश देण्याची निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments