कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत असते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन तुटवड्याची माहिती मिळताच स्थानिक आमदार विनोद अग्रवाल तेथे पोहचले.
त्यांनी जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातून माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या मदतीने 40 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. तर छत्तीसगडमधील माजी मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांच्या माध्यमांतून 90 सिलेंडर उपलब्ध करून दिले.
ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला, रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा झाला असता तर रुग्णांचा जीव धोक्यात गेला असता. अपक्ष आमदार अग्रवाल यांनी केलेल्या कामाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.
0 Comments