वाशिम, दि. 26
◆ मालेगांव तालुक्यातील महिला स्वयंसहाय्यता समुहांना कर्ज मंजूरीकरीता 26 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय बँक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 81 स्वयंसहाय्यता गटांना 1 कोटी 2 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, मालेगांव पंचायत समिती उप सभापती श्री. घोडे, प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे, अग्रणी बँक व्यवस्थापक दतात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती. सेंट्रल बँक मेडशी यांनी 39 बचतगटांना 44 लक्ष, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मालेगांवने 17 समुहांना 27 लक्ष, विदर्भ कोकण बँक शिरपूरने 4 समुहांना 6 लक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र शिरपूने 9 समुहांना 9 लक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र वासारीने 9 समुहांना 9 लक्ष, एचडीएफसी बँकेने 4 समुहांना 6 लक्ष असे एकूण 81 समुहांना 1 कोटी 2 लक्ष रुपये कर्ज मंजूर केले.
*******
0 Comments