…अमरावती पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई…
मूर्तिजापूर शहरात सर्रास गुटखा विक्री करणारा गुटखा माफिया गजानन अग्रवाल याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हरीया जिनिंग गोडावून मध्ये अमरावती पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाच्या टीमने छापा टाकून प्रतिबंधीत गुटख्यासह ४३ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ४ आरोपींविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणात ठाणेदार सचिन यादव यांची तातडीने मुख्यालयी अटॅच केले असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शहरात सुरु असलेल्या गुटका माफियावर शहर पोलिसांची मेहरबानी दिसून येत होती, गुटखा माफियाचे याचे मूर्तिजापूर शहरासह इतर तालुक्यातही गुटखा पुरवतो असल्याचा माहिती अमरावती पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळाली असता काल त्यांच्या टीमने कोहीनुर होटेल जवळील हरिया जिनिंग गोडाऊन मध्ये त्यांनी छापा घातला. या छाप्यात गुटख्यासह ४३ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी जावेद अहमद खान रा, मूर्तिजापूर, शेख नदीम शेख रहीम रा. विजापूर, अब्दुल नासीर रा.मूर्तिजापूर व गजानन अग्रवाल रा. मूर्तिजापूर यांच्या जवळून वाह कंपनीचा २ लाख ८८ हजाराचा प्रतिबंधित गुटखा, गोडाऊन मधील ३१ लाख ५० हजार रुपये किंमतीचा नजर प्रतिबंधित गुटखा, १ लाख ८० हजाराचा माजी गुटखा, ३ लाख २० हजाराचा वाह गुटका, ४० हजाराचा हॉट कंपनीचा गुटखा, एच५ कंपनीचा ५० हजाराचा गुटका व ३ लाखाचे एक चार चाकी वाहन असा एकूण ४३ लाख २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्रकरणी जावेद अहमद खान रा, मूर्तिजापूर, शेख नदीम शेख रहीम रा. विजापूर, अब्दुल नासीर रा.मूर्तिजापूर व गजानन अग्रवाल रा. मूर्तिजापूर यांच्या जवळून वाह कंपनीचा २ लाख ८८ हजाराचा प्रतिबंधित गुटखा, गोडाऊन मधील ३१ लाख ५० हजार रुपये किंमतीचा नजर प्रतिबंधित गुटखा, १ लाख ८० हजाराचा माजी गुटखा, ३ लाख २० हजाराचा वाह गुटका, ४० हजाराचा हॉट कंपनीचा गुटखा, एच५ कंपनीचा ५० हजाराचा गुटका व ३ लाखाचे एक चार चाकी वाहन असा एकूण ४३ लाख २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी व जप्त मुद्देमाल येथील शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला व भादंविच्या २७२, २७३, ३२८ तसेच अन्न सुरक्षा अधिनियमाच्या २६ व ५९ कलमान्वये आज आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


0 Comments