Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यात लस न घेतलेल्या 29 व्यक्तींना दंड




वाशिम
    जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लस घेण्यास टाळाटाळ करून ज्यांनी आतापर्यंत एकही डोस घेतला नाही, त्यांच्याकडून दंड आकारण्यात येत आहे.दंडात्मक करावाईमुळे लस न घेता फिरणाऱ्या व्यक्तींना आळा बसण्यास मदत होईल व ते आपल्या आरोग्याचा विचार करून लवकर लस घेतील. 
          रिसोड शहरात लसीकरण न करता खासगी आस्थापनांमध्ये प्रवेश करणाऱ्या तीन व्यक्तींना तहसीलदार रिसोड यांनी 1500 रुपये दंड आकारला.तहसीलदार मालेगाव यांनी शहरातील चार आणि ग्रामीण भागातील चार अशा एकूण 8 खासगी आस्थापनांना 4 हजार रुपये, मंगरूळपीर तहसिलदार यांनी शहरातील 10 खासगी आस्थापनांना 5000 रुपये आणि तहसीलदार कारंजा यांनी शहरी भागातील 6 आणि ग्रामीण भागातील 2 अशा एकूण 8 खाजगी आस्थापनांच्या व्यक्तींवर 4 हजार रुपये दंड आकारला.



Post a Comment

0 Comments