साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना पठविले स्वच्छतेचे महत्त्व
प्रतिनिधी =- वनोजा
वनोजा येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक संस्थाद्वारा संचालित साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने कडुन विशेष जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये स्वयंसेवकांनी स्वच्छतेचे महत्त्व गावकर्यांना पटवुन दिले. यावेळी स्वच्छतेच्या नारे देऊन परिसरात जनजागृती केली. तसेच चौकामधील संत गाडगेबाबा यांच्या यांच्या पुतळ्याचे पुजन व हारार्पन यावेळी रासेयो कडुन करण्यात आले. यानंतर वनोजा येथील चौकामध्ये स्वयंसेवकांनी स्वच्छतेचो महत्त्व हागणदारीमुक्त गाव या विषयावर अतिशय सुंदर असे पथनाट्य सादर केले. हागणदारीमुक्तीचा संदेश यावेळी स्वयंसेवकांनी दिला.रासेयो स्वयंसेवकांनी गाडगेबाबा ची घेतलेल्या वेशभूषे ने गावकर्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी वनोजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गांजर गवत निर्मुलन, तसेच प्लॅस्टिक निर्मुलन केले. यासोबतच परिसराची स्वच्छता करून गाडगेबाबांना आगळेवेगळे अभिवादन वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा राष्ट्रीय सेवा योजना ने केले.
यासोबतच महाविद्यालयामध्ये देखील गाडगेबाबांच्या फोटोचे पुजन व हारार्पन करण्यात आले.या कार्यक्रमाला डाॅ. गजानन घोंगटे, आयक्युएसी समन्वयक प्रा.जया भगत; कार्यक्रम अधिकारी प्रा. बापुराव डोंगरे तसेच महिला कार्यक्रम अधिकारी डाॅ. ममता पाथ्रीकर तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश लहासे सर प्रा. दीपक भगत सर , डाॅ. सचिन कडु सर, लेफ्टनंट डाॅ. सुनिल बोरचाटे तसेच स्वयंसेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.



0 Comments