Ticker

6/recent/ticker-posts

तंत्रशिक्षण सहसंचालक मानकर यांची शासकीय तंत्रनिकेतनला भेट


वाशिम : वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनला अमरावती येथील विभागीय कार्यालयातील तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉ .व्ही. आर. मानकर यांनी २९ डिसेंबर रोजी भेट दिली. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. बि. जी. गवलवाड, उद्योजक अनिल घुनागे, पंकज बाजड, विनोद इंगळे, विभाग प्रमुख के. पी. जोशी, एन. एस. विद्यासागर, यु. ए. बागडे, पी. एम. भुयार, डी. के. बावणे, एस. एम. खेरडे, डॉ. आर. जी. बिलोलीकर उपस्थित होते.

यावेळी सहसंचालक श्री.मानकर यांनी संस्थेचे प्राचार्य, उपस्थितीत उद्योजक, विभाग प्रमुख यांच्यासमवेत बॉडी ऑफ गव्हर्नसची सभा घेतली. सहसंचालक डॉ.व्ही. आर. मानकर यांनी संस्थेचे एनबीए तसेच स्कूल कनेक्ट कार्यक्रम इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. बि. जी. गवलवाड यांनी एनबीएच्या अनुषंगाने केलेली कामे तसेच यावर्षी राबविण्यात येणाऱ्या स्कूल कनेक्ट कार्यक्रमाची माहिती सांगून संस्थेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावर सहसंचालक यांनी संस्थेच्या कामाबद्दल व प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

श्री. मानकर यांच्या भेटीदरम्यान संस्थेमतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून शासकीय तंत्रनिकेतन येथील जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या जिमचे आणि नॉन एआयसिटी डिप्लोमा इन एलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इक्युपमेंट अभ्यासक्रमाचे उद्घाटन करून 5 जानेवारी 2022 पर्यंत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा. असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments