Ticker

6/recent/ticker-posts

खाकी वर्दीतील दादा नी भटकणाऱ्या तीन चिमुकल्यांसह मातेला शोधून दिला नातेवाईकांचा आसरा




 
 
या बातमीचे खरे वास्तव्य


रात्रंदिवस खाकी वर्दीतील दादा कार्य करत असताना गुरुवारी दि .2 डिसेंबर 2021च्या रात्री 9:45 वाजता  शेखर खडसे व अमोल सुरोशे यांनी माहिती दिली की , अकोला चौकातील मोहीनी झेरॉक्स समोर  एक अनोळखी महिला तिच्या तीन मुलांसह रात्रीला भटकत आहे .
लगेच सामाजिक जाण बाळगणारे मंगरूळपीर पोलीस विभागाने  कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे यांना दिली . त्यांनी अकोला चौकातून सदर महिला व मुलांना सन्मानाने पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली  असता त्या दुखित महिलेने  सांगीतले की माझे पती चे निधन झाले असून मी भीक मागत मागत शेगाव वरुन इथपर्यंत आले एस .टी  . बस चा संपामुळे कशी बशी मंगरुळपीर ला आले असे सांगितले पोलिसांनी सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना याविषयी माहिती दिली 
पोलीस मित्र तथा पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विनोद डेरे यांनी वाशिम जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना माहीती दिली तर समाज कल्याण आयुक्त  मारोती वाट यांनी महिला बालकल्याण विभागाला संबंधित प्रकरणाची माहिती दिली .
त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदशनात मंगरूळपीर तालुका संरक्षण अधिकारी धीरज उचीत , कार्यकर्ता एकनाथ राठोड ,शुभांगी ढोके टीम मेंबर , गोपाल आरू टीम मेंबर , समुपदेशक संतोष भगत या टिमने तात्काळ मंगरूळपीर पोलीस स्टेशन गाठून सदर महिला वैशाली रमेश पवार वय 26 वर्षे रा .फुकट नगर पुसद . राजश्री रमेश पवार 7 वर्ष ,गजानन रमेश पवार 4 वर्ष , श्रावणी रमेश पवार 3 वर्ष, यांची चाईल्ड लाईन ने विचारपूस करून पोलिसांनी त्यांचे नातेवाईक मंगरूळपीर येथील दीपक साळुंके, विजय मधुकर साळुंखे रा . मंगलधाम यांच्या ताब्यात देण्याची कारवाई आज दि.3 डिसेंबर शुक्रवारी करण्यात आली .

ही कारवाई मंगरूळपीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शना मध्ये  पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे  ,सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा मोरे, हेडकॉन्स्टेबल सोळुंके, नायक महीला पोलीस ज्योती डोंगरदिवे, सुनील गंडाईत , सुमीत चव्हाण , हेड कॉन्सटेबल केशव चंदेल , पोलीस कॉन्स्टेबल बबन अंबोरे यांनी केली . 
कोरोना महामारी च्या काळात आपले प्राण पणाला लावून कार्य केले
माणूस म्हणून आज सुद्धा खऱ्या अर्थाने पोलीसांनी दाखवून दिले सामाजीक बांधीलकी जोपासत संघर्ष मय जीवन जगत असताना  पोलिसांतील माणूस म्हणून खाकी वर्दीतील दादांचे दर्शन घडवून दिले . या कामगीरी मुळे  मंगरुळपीर पोलीसांचे केले तेवढे कौतुक थोडे आहे .


खाकी वर्दीतील दादा ताईंना वाशिम खबर आवाज महाराष्ट्र च्या वतीने जय हिंद जय महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments