Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधीजींच्या विरोधात वक्तव्य करुन प्रशिद्धीच्या झोतात आलेल्या कालीचरण महाराजला अटक



महात्मा गांधीजींच्या विरोधात वक्तव्य करुन प्रशिद्धीच्या झोतात आलेल्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. कालीचरण महाराजा विरोधात महाराष्ट्रासह  छत्तीसगड,मध्ये  गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून त्याला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांकडून ही कारवाई केली गेली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली .



कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या मारेकरी नथुराम गोडसेचे  गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून कालीचरणविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही त्याने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले होते. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण  शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली आहे.

कालीचरणचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोला जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. रायपूर येथे रविवारी पार पडलेल्या धर्मसभेत अकोला येथील कालीचरण याने आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्दाचा उच्चार करून वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. राजकीय-सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातून कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. कालीचरणला अटक व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती . काल अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कालीचरण महाराजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

कोण आहे ‘कालीचरण.?
‘कालीचरण महाराज’ अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतो. त्यांच मुळ नाव ‘अभिजीत धनंजय सराग’ असे आहे. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक असल्याचे सांगितले जाते.  तो कालीमातेची आराधना करायचा. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. पुढे लोकांनी त्याला ‘महाराज’ संबोधनं सुरू केलं. मात्र, ‘कालीचरण महाराज’ स्वत: आपण महाराज नव्हे तर ‘कालीमाते’चा भक्त आणि पुत्र असल्याचं सांगतो आहे.




Post a Comment

0 Comments