Ticker

6/recent/ticker-posts

दिलदार मनाचा राजा, राज्यमंत्री बच्चु कडू यांनी दिली बच्चूकंपनी ला भेट.




दिनांक:-3/12/2021 शुक्रवार

यालाच म्हणतात खरे समाजकारण जगाच्या पाठीवर आपण कोण आहोत आणि आपले कर्तव्य काय आहे हे बच्चुभाऊ अगदी अंतकरणापासून समजतात लहान-मोठा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आपुलकीच्या आणि मायेच्या भावनेने  राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सोबत बच्चूकंपनी उपस्थित होते बच्चू कंपनी म्हणजे लहान मुले देवा घरची फुले
लहान लहान मुलांनी  राज्य मंत्र्याचा ताफा जात असतांना गाडीला हात दाखवताच  भाऊ ने तात्काळ गाडी थांबून त्यांच्याशी संवाद साधला व लहान मुलांनी आपल्या सर्व विषय सांगितले व राज्यमंत्री यांनी बच्चूकंपनी यांना आपल्या गाडीत बसून
 नेले बच्चूकंपनी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना रवींद्र गवळी यांच्या घरी नेले व सांगितले सर्व हकीकत व मंत्री बच्चू कडू यांनी केली मोठ्या मनाने  परिवारातील सदस्यांना मदत  


महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार बच्चू कडू हे  त्यांच्या मतदारसंघाचा दौरा करत असताना बच्चूकंपनी याच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही महाराष्ट्राचे राज्यमंत्री नामदार बच्चू कडू हे त्यांच्या मतदारसंघाचा दौरा करत असताना बच्चूकंपनी याच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही . तर दौर्या दरम्यान काही बच्चूकंपनी राज्यमंत्र्यांच्या गाडीलाच हात दाखवत त्यांना आपल्यासोबत नेत  घरकुलाच्या प्रश्न सोडविण्याची विनवणी केली  ,मोठय़ा मनाचे नामदार बच्चू कडू यांनीसुद्धा बच्चू कंपनी ला आपल्या वाहनात ताबडतोब बसवून घेत त्यांच्या घरी जात घरच्यांचे व घरकुला बाबतचे प्रश्न जाणून घेतले 


 . ज्या घरी नामदार बच्चू कडू पोहोचलेत त्या घरातली परिस्थिती अतिशय हलाखीची आहे तरीसुद्धा येथील मोठा मुलगा एमपीएससीच्या परीक्षेसाठीचा सराव करत असल्याचे बच्चू कडूंना आढळले . त्यामुळे त्याला काही आर्थिक मदत राज्यमंत्र्यांनी केली  . त्याचबरोबर चिमुकल्याचे आजोबा कापडांना ईस्त्री करन्याचे काम करत असल्याचे लक्षात येताच त्यांनासुद्धा नवीन ईस्त्री व इतर  धंद्याकरिता आर्थिक मदत राज्यमंत्र्यांनी केली . मात्र काहीही असो दररोज शेकडो नागरिक राज्यमंत्र्यांच्या आजूबाजूला गराडा घालत असतात मात्र आज चक्क बच्चूकंपनी यांनी राज्यमंत्र्यांना वीनवणी करून आपल्या घरी नेत समस्या मार्गी लावण्याचे आवाहन केल्याने राज्य मंत्रीसुद्धा बच्चूकंपनी ला कुतूहलाने गहिवरून गेले होते  . .

Post a Comment

0 Comments