मंगरूळपीर-स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळांतर्गत अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांवर विद्यार्थिनीने मौखिक व प्रोजेक्टर द्वारे सेमिनार प्रेझेंट केले. गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ समन्वयक प्रा. जाजू, अध्यक्ष डॉ. वाघोळे सर, प्रमुख अतिथी डॉ. खान मॅडम उपस्थित होते. समन्वयक प्रा. जाजू यांनी विद्यार्थी मध्ये असलेल्या अध्यापन कौशल्याला वाव देण्याकरिता तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व ही जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविले जातात असे मत
प्रतिपादन केले.
बी.ए. भाग 1चे ललिता निंबेकर, सानिका आखाडे ,कविता सावंत, ईश्वरी चौधरी, मायावती मनवर, वैष्णवी ठाकरे, सानिका आगाशे ,पूजा सोळंके, प्रिया राऊत ,प्रतिक्षा चौधरी, सुप्रिया भगत ,अश्विनी तायडे, साक्षी भगत, शरयू इंगोले, मोहिनी मनवर, प्रलय घोडे, निकिता खिराडे ,वैष्णवी भगत, वैष्णवी राऊत ,किरण आटपाडकर, रेणुका मोरे ,सुष्मिता गेंड ,अंजली बोंबले इत्यादी विद्यार्थिनींनी मौखिक स्वरूपात सेमीनार प्रेझेंट केले.
बी.ए. भाग 3 चे सोनल साखरकर, दीक्षा सोनवणे, मयुरी राठोड ,पायल चव्हाण, प्रिया शिंदे, स्नेहल वाडेकर, प्रियंका ठाकरे, वैष्णवी चौधरी, शुभांगी राऊत, प्रियंका गावंडे, साक्षी मोरे, साक्षी ठाकरे, प्रीती रघुवंशी ,विद्या खंडारे इत्यादी अनेक विद्यार्थिनींनी प्रोजेक्टर द्वारा सेमिनार प्रेझेंट केले. हे सेमिनार दिनांक 20 ते 30 डिसेंबर 2021 पर्यंत चालले.
सोबतच सौ.जाजू यांनी बी.ए .भाग 1 2 व 3 च्या विद्यार्थ्यांनी करिता पी.पी.टी. द्वारे आपले विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्रा. सौ. सुषमा जाजू यांनी हे उपक्रम राबविले. यात जवळपास 40 विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला व उपक्रम यशस्वी संपन्न झाले.
प्रा. सो. सुषमा जाजू
समन्वयक
गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ
य . च.कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर, जि.-वाशिम




0 Comments