Ticker

6/recent/ticker-posts

बनावट खरेदी प्रकरणातील...चार आरोपींना अटक




शिरपूर जैन येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या बनावट खरेदी प्रकरणातील चार आरोपींनी पोलिसांनी दि. २८ डिसेंबर रोजी अटक केली आहे. अद्यापही अनओळख महिलेसह दोन आरोपी फरार आहेत. मात्र फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्य तक्रारीनुसार मुख्य आरोपी असलेल्या अधिकाऱ्याला पोलिसांनी अद्यापही आरोपों केले नाही. अधिकान्यालाच फिर्यादी करून इतर आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे कार्यरत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ येथे दिनांक १/१०/२०२१ रोजी मुंगळा वेथिल एका महिलेची १.३५ हेक्टर शेतजमीन बनावट खरेदीखताद्वारे परस्पर बनावट तयार करून कोणतीही शहानिशा न करतानयोधमोल कार्यालयातील कर्मचारी आणि दलालाने संगनमत करून विक्री केल्याचा प्रतापया कार्यालयाने केल्याचे तक्रारीवरून उघड झाले होते. सदर महिलेने दुय्यम निबंधक कार्यालय विरुद्ध लेखी तक्रार देऊनही निबंधक अधिकाऱ्याचा आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र याच प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधकां पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता त्यातील संजय सोभागे, दिलीप सोभागे, गजानन सोभागे, अमोल सोभागे सर्व राहणार माळी वेटाळ मालेगाव या चार आरोपींना पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी अटक केली आहे. तर अनओळखी महिलेसह अनतोदम व गजानन भिकाजी चोपडे, हे फरार आहेत. सदर प्रकरणी शिरपूर पोलीस चौकशी करीत आहेत. सदर प्रकरण कीस आल्याने येथील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व दलालांचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक दिसून येते. मुद्रांक विक्रेते यांना मुद्रांक विक्री करण्याचा परवाना आहे. मात्र काही दलाल यामध्ये सक्रिय हुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात आहे. दलालांवर विश्वास ठेवून व आर्थिक देवाण- घेवाण करून अनेक बेकायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कार्यालयाच्या रेकॉर्डची चौकशी झाल्यास अनेक बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही? या सर्वच पैलूवर निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. निष्पक्ष चौकशी झा मोठा मासा गळाला लागुण मुख्य गुन्हेगार कायदेशीर कारवाई हावी अशी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे..

Post a Comment

0 Comments