Ticker

6/recent/ticker-posts

गोवंशाची तस्करी करणारे मंगरूळपीर पोलिसांच्या जाळ्यात






पोलीस उपनिरीक्षक आघाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कार्यवाही.



मंगरूळपीर पोलिसांनी अमरावतीहून हिंगोली जात असणारा महिंद्रा कंपनीचा बुलेरो पिकप वाहन क्रमांक एम. एच. २९ एटी. ०१०८ यास रात्री पोलीस नाकाबंदी दरम्यान तपासणीकरिता थांबविला असता न थांबल्यामुळे पोलिसांनी सिनेस्टाईल त्याचा पाठलाग करत गाडीसह तीन बैल जोडी बोलेरो पिकप व दोन आरोपी असा  मुद्देमाल ताब्यात घेऊन मंगरूळपीर ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आघाव साहेब  यांनी ही धडक कारवाई केली. 


त्या साही बैलांची आज सकाळी चांभई येथील गौरक्षणमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना येथे मुक्त करण्यात आले. या सदर कार्यवाही मध्ये पो.ना. अमोल मुंदे , पो.ना. मोहम्मद परसुवाले पो. शि ठाकरे यांचा सहभाग असुन या प्रकरणांमध्ये कुठली कार्यवाही केली जाते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या विरोधात यापूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते गोवंश तस्करी करणाऱ्या वर जर थातुरमातुर कारवाई केली गेली तर  निश्चितपणे पूर्णा शहरात आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही .



 दिवसा  घरफोड्या होत असल्यामुळे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी मंगरुळपीर शहर वाऱ्यावर सोडून चालणार नाही. दिवसा तीन घरफोड्या होऊनही जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब मंगरूळपीर शहरात साधी भेट सुद्धा दिली नाही यावरून काय समजावे

Post a Comment

0 Comments