Ticker

6/recent/ticker-posts

अनिरुद्ध राम अवताडे या चिमुकल्या चा वाढदिवस वृक्षारोपण करून केला साजरा




मंगरूळपीर
३-१२-२०२१ रोजी ध्यास व जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा व पोलीस मित्र अश्विनी अवताडे यांच्या मुलाचा वाढदिवस महात्मा फुले उद्यान येथे विविध प्रकारचे झाडे लावून साजरा केला.आधुनिकीकरणाच्या नावाखाली झाडाची संख्या कमी झाली ती भरून काढायची असेल तर प्रत्येकाने एक तरी झाड लावून जगणे ही काळाची गरज आहे असे केल्यास नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती होईल व कोणावरी ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येणार नाही 


कोणाचाही मृत्यू ऑक्सिजन अभावी होणार नाही त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावू जगावे असे यावेळी अश्विनी ताईंनी सांगितले .गेली एक वर्ष झाले मंगरूळपीर मध्ये कोणत्या ना कोणत्या दिवसाचे औचित्य साधून अवताडे ताई झाडे लावून जगण्याचे काम करत आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती मंगरूळपीर शहराच्या नगराध्यक्ष डॉक्टर गजाला खान मॅडम उपस्थित होत्या. एकदम साध्या पणाने झाडे लावून वाढदिवस साजरा केला म्हणून नगर अध्यक्ष मॅडम मी अनिरुद्ध याचेकौतुक केले. डॉक्टर राम अवताडे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments