अहो न्याय देता का साहेब न्याय
मंगरूळपीर नगरपरिषद कार्यालयासमोर तीन दिवसापासून आंदोलन सुरू .सेवा निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ अदा याबाबत. राज्यातील नगरपरिषदांमधील सेवानिवृत्त कर्मचा-यांना
सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ विहित मुदतीत अदा करण्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद मुख्याधिकारी ऱ्याची असते . यासाठी आर्थिक व प्रशासकीय उपाययोजना करण्याबाबत खालील पत्रव्यवहाराद्वारे यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत. परंतु सूचनेचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता सेवानिवृत्त कर्मचा-यांना असाभेटीची वागणूक मिळत असल्याचीही या कर्मचाऱ्यांत बोलले जात आहे या सर्व बाबींमुळे हे सेवानिवृत्त कर्मचारी कंटाळून नाइलाजास्तव आंदोलन करीत असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचे जे देणे-घेणे असतील त्या बाबीचे अवलोकन करून या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वयाचा विचार करावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचे साधन. वयांच्या जीवनाचा आधार असलेल्या सेवेतील मोबदल्याच्या भरोशावर असल्यामुळे मंगरूळपीर नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ न मिळाल्यामुळे पाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला विविध आजाराने घासलेले शरीर घेऊन हे कर्मचारी आपले जीवन जगत आहे असेही मुख्याधिकारी यांच्या निदर्शनात आणून देऊनही यांच्या औषध पाण्यासाठी सुद्धा मोबदला देण्यात आला नव्हता त्यामुळे हे सेवानिवृत्त कर्मचारी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन करत आहे नगरपरिषद मध्ये विविध कामासाठी निधी उपलब्ध आहे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचा मोबदला देण्यासाठी निधी उपलब्ध नाही असे सांगत त्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र मंगरूळपीर नगरपरिषदेच्या समोर टाकलेल्या पेंडल मध्ये दिसत आहे. या वयात या कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन आता सुरू केले आहे या आंदोलनाला कशा पद्धतीने न्याय मिळेल अशी चर्चा जनसामान्यात सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला न्याय देण्यासाठी वेळ आहे का असे आता जनसामान्यात उलटसुलट चर्चा होत आहे.
0 Comments