Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय आयोगाच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार विनोद डेरे यांची नियुक्ती

वाशिम - समाजात निर्माण होणार्‍या अत्याचारांविरुद्ध आणि समस्यांविरोधात लोकांना जागृत करून प्रशासनाच्या मदतीने त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय आयोगाच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी मंगरुळपीर येथील युवा पत्रकार विनोद रामकृष्ण डेरे यांची नियुक्ती करण्यात आली. आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मेहताब रॉय व राष्ट्रीय सचिव अखिलेश चौधरी यांच्या स्वाक्षरीने मंगळवार, ४ जानेवारी रोजी डेरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले
  मानवाधिकारांचे उल्लंघन, महिला अत्याचार, बालमजुरी यासह समाजातील अत्याचारांविरुद्ध राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय आयोग आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य करत आहे. हा आयोग कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करत असून आयोगाच्या ध्येयधोरणानुसार जिल्ह्यात लवकरच जिल्हा, तालुका, शहर व  ग्राम पातळीवर कार्यकारणी गठीत करुन कार्याला गती देण्यात येईल अशी ग्वाही डेरे यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी विश्वकल्याण व मानवजातीच्या हितासाठी काम करण्याची शपथ घेतली. झालेल्या निवडीबद्दल समाजरत्न पुरस्कारप्राप्त लकी चांदवाणी मुंबई यांनी डेरे यांना शुभेच्छा दिल्या. विनोद डेरे हे पंचशिल बुध्दविहार मंगरुळपीरचे अध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस मित्र नागरिक समन्वय समितीचे जिल्हा संपर्कप्रमुख, इंडीयन प्रेस कौन्सीलचे जिल्हाध्यक्ष, विश्वकल्याण वृत्तपत्राचे संपादक, न्युज वन इंडिया, महाराष्ट्र टीव्ही २४ व लोकशासन वाहीनीचे जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत आहेत.


Post a Comment

0 Comments