Ticker

6/recent/ticker-posts

न. प. मंगरूळपीर अधिनस्त कर्मचारी शासनाच्या आदेशाला केराची टोपली, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर आणली आत्महत्या ची वेळ

कोरोना प्रतिबंधक काळात सेवानिवृत्त, वयोवृद जेष्ठ नागरीकांना न.प.मंगरुळपीर समोर धरणे आंदोलन करणे  भाग पाडीत आहे
 मुख्याधिकारी कार्यालय नगर परिषद मंगरुळपीर जा.क्रं. आस्थापना विभाग २०१९ दिनांक ४/१/२०२२ चे पत्राच्या 
उपरोक्त विषयाकित पत्राच्या अनुषंगाने, आपण आपल्य पत्रातच दि. 4 /1/22 ला कळविले की, संघटना दि. 12/1/2022 पासुन आंदोलन सुरु करेल जेव्हा की संघटना चार दिवसापासून धरणे देत आहे. 
तसेच कित्येक कामगाराचे सेवाउपदान, रजारोखीकरण, आश्वासीत प्रगती योजनातील फरकांच्या रक्क्मा, इत्यादी थकीत रक्क्मा आपण न.प. कर्मचारी जवळपास १०-२० वर्षापासुन सेवानिवृत्त झालेल्या कित्येक कर्मचाऱ्याची देणी अद्याप पर्यंत दिली नाही. तसेच काळबध्द १२ वर्षाचा लाभाच्या तसेच आश्वासीत योजनेच्या थकीत रक्क्मा आपण दिलेल्या नाही. आपणास या बाबत माहिती अधिकारा अंतर्गत माहिती, माहिती मागणी केली असता आपण दिलेल्या माहिती मध्ये सदर रक्कमेचा अंर्तभाव न करता चुकीची अर्धवट माहिती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिली आहे. याबाबत आम्ही आपणाकडे वारंवार मागणी करुन सुध्दा सदर माहिती आम्हाला मिळाली नाही. उपरोक्त माहिती संबंधी संघटनेने २०/११/२०२० लाच आक्षेप नोंदविला होता. आपण त्या संबधीची अद्यापही दखल घेतलेली नाही. उलट माहिती पुरविली बाबत कळविले आहे. तरी वरील आक्षेपा बाबत काय कार्यवाही केली याची संबधीताकडून विचारणा करावी. तसेच मा. वैभव वाघमारे साहेब तत्कालीन मुख्याधिकारी यांनी संबधीत कर्मचाऱ्यांना सहाय्यक
 निधीखात्यमधुन प्राप्त रक्कमेच्या निधीतून ५% निधी सेवानिवृत्ती धारकांच्या थकीत रक्कमा देणे करिता वापरावा असे सक्त तकीत दिली होती. परंतू सदर मुख्याधिकारी बदलीव्दारे येथून निघून गेल्यपासून संबधीतानी सदर खाती रक्कम जमा केली नाही अथवा सेवानिवृत्तीधारकांना दिली सुध्दा नाही. याचाच अर्थ आपण व आपले अधिनस्त कर्मचारी शासनाचे आदेशाचे अवेलना करित असल्याचे समजते . व आम्ही वयवृध्द सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या वयात हेतुपुरस्पर त्रासदेण्याची भुमीका घेत आहात असेच धोरण आपले दिसत आहे.


शासनाचे आदेशा प्रमाणे ७व्या वेतनाचे सेवानिवृत्तीधारकांना रोखीने थकीत रक्कमा देणे बाबत आदेशित असून आम्हाला सदर चेतनाचा २ व ३ हप्ताथ अद्याप पर्यंत दिला नाही. आपण माहे नोव्हेंबर २०२१ मध्ये देणे संबंधी आश्वासीत केले होते. तसेच आपण दिनांक ४/१/२०२२ ला आमचे धरणे आंदोलन मंडपात येवून सदर रक्क्क देणे संबंधी सर्वासमोर सांगीतले होते. परंतू काही वेळातच आपण सदर निर्णय बदलून आम्हास लेखी पत्राव्दारे कळविले की, आपणास टप्याटप्याने थकीत रक्क्मा देण्यांत येईल. आजरोजी आमचे सेवानिवृत्त कर्मचारी मरणाच्या दारात उभे आहेत जर त्यांच्या औषाधोपचारा करिता सदर पैशाचा उपयोग होणार नाही तर त्याच्या मरणानंतर काय कामाचा. या कोरोना काळात आमच्या वयवृध्द कर्मचाऱ्यांवर आमचेच हक्काचे जमा असलेल्या थकीत रक्क्मा भिकेसमान मागणी कराव्या लागत आहेत. याचा आपणच विचार करुन  करावे.७ व्या वेतनाती फरकाच्या रक्क्मा मागील दोन हप्ते सुध्दा आपण दिले नाही. करिता आपण महाराष्ट्र नागरी सेवा (विहीत वेतन) नियम १९८२ च्या नियम ५९ तसेच प्रकरण १० मधील नियम ११८ ते १२५ च्या तरतुदीचे पालन केले नसुन सेवानिवृत्तांना थकबाकी देण्यास विलंब केल्याचे दिसुन येते, यास आपण स्वत: जबाबदार आहात. जो पर्यंत थकीत रक्क्मा देणे संबधी ठोस निर्णय होत तसेच सेवेत असतांना मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे सानुग्राह अनुदान सुध्दा दिले नाहीत व ७ व्या वेतनातील दोन हप्त्याच्या रक्क्मा आम्हास मिळत नाही. तो पर्यंत संघटना आपले धरणे आंदोलन कार्यक्रम सुरुच ठेवेल जर या धरणे आंदोलनामध्ये कोरोना पासुन कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास किंवा आमच्या वयोवृध्दामधील कोणही बांधीत झाल्यास यास आपण स्वता व्यक्तीशा जबाबदार राहाल. साहेब आम्हाला न्याय द्या मरण यात्रेच्या खाईत लोटून नका

Post a Comment

0 Comments