मंगरुळपीर :
वैचारिक तरुणांचे बलशाली संघटन अशी ओळख असलेल्या संभाजी ब्रिगेडची बैठक मंगरुळपीर येथील विश्रामगृह येथे दि.३० रोजी उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत गावंडे व वाशिम-मंगरुळपीर विधानसभा अध्यक्ष राहुल बलखंडे उपस्थित होते.
या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या मंगरूळपीर शहराध्यक्षपदी सुमित मेटकर तर तालुका प्रवक्ता पदी शिवाजी गजभार यांची जिल्हाध्यक्षांच्या हस्ते निवड करण्यात आली.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कोषाध्यक्ष गणेश गावंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, तालुका सचिव शुभम मनवर, तालुका उपाध्यक्ष गोपाल नानोटे, तालुका संघटक श्रीकृष्ण भरदुक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments