Ticker

6/recent/ticker-posts

भूमिपूत्र' च्या उपोषणाची सांगता ! चौकशी करून कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन विष्णूपंत भूतेकर, नागेश घोपे यांची यशस्वी मध्यस्थी

 वाशिम :  टो येथील अंतर्गत रस्त्यांचे निकृष्ठ काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भूमिपूत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची आज (दि.२८)  सांगता करण्यात आली. भूमिपूत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भूतेकर व भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर प्रशासनाने चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
         वाशिम तालुक्यातील टो येथे जिल्हा परिषदेमार्फत २५/१५ च्या निधीतून अंतर्गत सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते करण्यात आले. परंतु कंत्राटदाराने सदर काम अंदाजपत्रकानुसार न करता थातुरमातुर केले. परिणामी, अल्पावधितच रस्ता उखडला. भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष सचिन काकडे व सर्कल प्रमुख गजानन काकडे यांनी कामाच्या दर्जाची चौकशी करून निकृष्ठ काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे केली होती. प्रशासन दखल घेत नसल्यामुळे उभय पदाधिकारी २७ मार्चला जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले होते. भूमिपूत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भूतेकर व भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे, भूमिपूत्रचे प्रवक्ता देव इंगोले, तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे आदींच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाने चौकशी करून कारवाईचे लेखी आश्वासन दिले. शिवाय चौकशी पूर्ण होईस्तोवर कंत्राटदाराला देयक अदा न करण्याचे आदेश ग्रामपंचायत सचिवाला दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी शत्रूघ्न अवचार, सतिश गंगावणे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments