कारंजा [ लाड ] : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती, जवळपास २६.४२ टक्क्यांनी खाली आल्या आहेत . असे असतानाही रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून देशात पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या महागाईचा भडका उडाला आहे . गेल्या सात दिवसांत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सहा वेळा वाढ केली आहे . आता आठवडाभरात या दोन्हींच्या दरात लिटरमागे जवळपास सहा रुपयांनी वाढ झाली आहे . नवीन दरांनुसार आज कारंजा येथे पेट्रोल ११७.३६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १०१.६१ रुपये प्रति लिटर विकले गेले . कच्च्या तेलाच्या किमती त्यांच्या फेब्रुवारीच्या उच्चांकी १४० डॉलर प्रति बॅरलवरून १०३ डॉलरवर घसरल्या आहेत . तरीही गेल्या सात दिवसांत तेल कंपन्यांनी सहा वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढविल्या आहेत . तेल कंपन्यांचा दृष्टिकोन पाहता भाववाढीचा हा क्रम पुढील १५ दिवस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे . त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागत आहे . त्यामुळे वाशीम जिल्ह्यासह, कारंजा तालुका, शहर येथील शिवसेनेच्या महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी, भाजपा केन्द्रशासनाचे विरोधात आक्रमक होत, इंधनाची सततची दरवाढ बंद करण्याकरीता तिव्र आंदोलन करीत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे याकरीता शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाने, संपर्कप्रमुख शिल्पाताई देशमुख, वैशालीताई घोरपडे, सुप्रदाताई फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनात व महिला संघटीका मंगलाताई सरनाईक, युवा जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे यांच्या उपस्थितीत वाशिम जिल्ह्याच्या युवतीसेनाप्रमुख प्रिया महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात कारंजा येथील शिवसेनेच्या सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत आज गुरुवारी दि .31 मार्च रोजी, कारंजा तहसील येथे, दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या महागाई विरोधात केन्द्रशासनाच्या विरुद्ध फलक घेऊन घोषणा करण्यात आल्या व त्यांनंतर, तहसिलदार कारंजा यांना केन्द्र शासनाच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले . यावेळी युवतीसेने च्या जिल्हा प्रमुख प्रिया महाजन यांच्या नेतृत्वात, उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक, तालुका प्रमुख विलासराव सुरळकर, शहर प्रमुख गणेशजी बाबरे, युवासेना शहरप्रमुख शंभुराजे जिचकार, उपशहर प्रमुख अतुल दरेकर, विद्यार्थी सेनाप्रमुख अश्विन जगताप, विभाग प्रमुख अजय मदनकर, महिला आघाडी तालुका प्रमुख मनिषा कराळे, महिला आघाडी शहर प्रमुख योगीता अंगाईतकर, सोनाली काठोये, चतुरकर ताई, वंदनाताई सुरजुसे, भास्कर कडू, संजय देशमुख, कैलास कराळे, प्रविण भुजाडे, सचिन जाधव इ शिवसैनिकांनी आंदोलनात भाग घेऊन प्रसार माध्यमाला प्रिया महाजन यांनी स्वतः माहिती दिल्याचे प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments