Ticker

6/recent/ticker-posts

भटक्या जमातीतील मुला मुलींना शिक्षण व आरोग्य मंगरूळपीर चा समाजसेवी के चा उपक्रम

भर उन्हात आरोग्य यंत्रणा कामाला

मंगरूळपीर मध्ये सामाजिक कार्यकर्ता अश्विनीताई राम औताडे यांच्याकडून पालावर भटक्या जमातीतील मुलांना शिकविण्याचा उपक्रम चालू आहे. यासोबतच इतर तेथे उपक्रम राबवले जातात त्यांच्या आरोग्याची ही काळजी घेण्यात येते तसेच त्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न चालू आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने आशा दिवस साजरा करण्यात आला होता त्या दिवशी अति जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ.देशमुख मॅडम ह्या उपस्थित होत्या. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी  ताई  यांची यांच्यासोबत  चर्चा झाली तेव्हा त्यांना सांगितले की पालावर भटक्या जमातीतील मुलांना मी शिकवायला जात असते तेव्हा डॉ.देशमुख मॅडम अश्विनी ताई सोबत पालावर च्या मुलांना भेटायला गेल्यावर तिथे सगळ्यांना आपुलकीने आपले समजून विचारपूस केली किती लसी घेतल्या लहान मुलांनी किती ड्रॉप घेतले तसेच गर्भवती महिलांची पाहणी करून त्यांनी कोणत्या कोणत्या तपासण्या केल्या धनुर्वाताची लस घेतली का याची विचारपूस केली आणि तात्काळ Tho ऑफिसला फोन करून तालुका आरोग्य अधिकारी मा. डॉ. अरविंद भगत यांना सांगितले मंगरूळपीर एसटी स्टँड परिसरातील पालात राहणाऱ्या इथे येऊन या मुलांचे आई-वडिलांचे लसीकरण करुन घ्या

डॉक्टर भगत यांनी मोलाचे केले मार्गदर्शन तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ

 तर दुसऱ्या दिवशी तिथे आरोग्य विभागाची टीम हजर झाली पण लोक लसीकरणासाठी तयार नव्हते तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगत सरांनी त्यांचं समुपदेशन केलं लसीचे महत्त्व पटवून दिले त्यांच्या भाषेत समजेल अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहित केले तसेच अश्विनीताई नी पण त्यांचे समुपदेशन केलं लसीमुळे होणारे मुला मुलींचे फायदे व आरोग्य कसे सुदृढ होईल माता सोबत मुलांचे आरोग्य कसे निरोगी राहील लहान मुलांना शिकवण्यासाठी जाणाऱ्या अश्विनीताई च्या विश्वासावर त्यांनी लसीकरण व सोनोग्रफिक सारख्या तपासण्या करून घेतल्या

समाजसेविका अश्विनीताई यांचा उपक्रमाला यश


 डॉ अरविंद भगत तालुका आरोग्य अधिकारी  ,डॉ अश्वीन गोडबोले समुदाय आरोग्य अधिकारी , शेख अलताफ आरोकय सहाय्यक , भिवरकर तालुका आरोग्य पर्यवेक्षक,
श्रीमती वनमाला भगत आरोग्य सेविका, शिंदे आरोग्य सेवक व ज्यांच्यामुळे पालात राहणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिकून मोठं करण्याची जिद्द असलेल्या समाजसेविका अश्विनीताई औताडे, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते

 पालातील नागरिकांच्या मनातील भीती दूर करून लसीकरणाला सुरुवात


या लहान चिमुकल्या मुलांची शिकून मोठा झाल्यावर डॉक्टर तर कोणाची पोलीस होण्याची इच्छा या मुलांनी व्यक्त केली


अश्विनी ताई व आरोग्य विभागाच्या टीमने आज उपक्रम राबवला या उपक्रमाला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा

Post a Comment

0 Comments