रिसोड,
पाटील कला व विज्ञान महाविद्यालय चे शैक्षणिक सत्र 2021-22 चे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्त ग्राम सवड येथे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. डी. बदर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.
20 मार्च ते 27 मार्च या दरम्यान ग्राम स्वच्छतेचा वसा घेऊन निघालेल्या विशेष शिबिरात व्यसनमुक्ती, प्लास्टिक बंदी, ग्रामस्वच्छता, व्यक्तिमत्व विकास, कोविंड लसीकरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जनजागृती, उन्नत भारत अभियान, जलसंधारण, मतदार जनजागृती, योगा कार्यशाळा, महिला सक्षमीकरण, माध्यमातील रोजगार संधी, गंदगी मुक्त भारत अभियान, उन्नत भारत अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, संविधान जनजागृती रॅली यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. आठ दिवशीय विशेष शिबिरामध्ये 50 स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी कार्यक्रम अधिकारी प्रा. तुळशीराम भोयर, प्रा. केशव कोकाटे डॉ. आम्रपाली भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष उपक्रम म्हणून स्वच्छता अभियान, पांदण रस्ता दुरुस्ती, पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत शेततळ्याची निर्मिती केली. तसेच संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश गावामध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडी काढून देण्यात आला. दुपारच्या बौद्धिक सत्रात राष्ट्रीय सेवा योजनेतून ग्रामविकास या विषयावर प्रा. रवी अंभोरे, पर्यावरण संवर्धन काळाची गरज या विषयावर डॉ. वाय. एस. साखरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई साहेब, तर युवकाचे सामाजिक कर्तव्य या विषयावर प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे यांनी मार्गदर्शन केले. युवकांमधील तान तनाव समस्या व उपाय योजना या विषयावर डॉ. रवी खडसे तर रासेयो तून व्यक्तिमत्व विकास या विषयावर जिल्हा समन्वयक डॉ योगेश पोहकर यांनी मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज व आजादी का अमृत महोत्सव या विषयावर अनुक्रमे प्रा. जयंतराव हेलोडे व प्रा. डॉ. बी. आर. तनपुरे यांनी मार्गदर्शन केले.
आकाशवाणीतील करिअर व संवाद कौशल्य तसेच महिलांचे कायदेविषयक अधिकार या विषयांवर श्री संदीप देशमुख केंद्रप्रमुख, स्वरानंत रेडिओ, करडा व अँड. सागर इरतकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला.
रात्रीच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव, हुंडाबंदी, लसीकरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, मतदान जनजागृती, संविधान जनजागृती, शेतकरी आत्महत्या, उन्नत भारत अभियान, स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत अशा विविध विषयांवर पथनाट्य मूकनाट्य इत्यादी प्रयोग केले. तसेच गावामधून टाळ मृदुंग घेऊन दिंडी काढून सर्वसामान्य माणसात संत गाडगेबाबाच्या अभंगातून स्वच्छते विषयी संदेश दिला. या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी झाले. यावेळी दत्तक ग्रामातील सरपंच सौ. सुनीताताई शेळके, उपसरपंच श्री दशरथ मोरे, ग्रामपंचायत सचिव श्री थोरात साहेब, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री किशोर भालेराव, जि. प. शाळा मुख्याध्यापक श्री संतोष सपकाळ, श्री उत्तमराव घोडे, श्री विलासराव शेळके, श्री प्रकाश राव मस्के, श्री सुभाषराव राऊत, श्री प्रभाकरराव पंडित, श्री दुर्गा भैय्या पांडे, श्री भगवानराव गाडे, श्री गजाननराव खंडागळे, श्री कैलासप्रसाद पांडे, श्री हरिभाऊ गाडे, श्री परमेश्वरराव पंडित, श्री रामा कापुरे, व ग्रामातील तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून सहभाग नोंदविला. शिबिराला नियोजनबद्ध व शिस्तबद्ध बनवण्यासाठी संस्था अध्यक्ष मा. बाबारावजी पाटील खडसे साहेब, सचिव अमित पाटील, माजी जी.प. उपाध्यक्ष गजाननरावजी लाटे, माजी प्राचार्य डॉ. जे. बी. देव्हडे, रासेयो क्षेत्रीय समन्वयक डॉ. पी.बी. हाडे इत्यादींनी मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. अमित पाटील हे होते तसेच प्रमुख वक्ते म्हणून रिसोड डॉ. असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अजय पाटील हे होते. दोनही पाहुण्यांनी स्वयंसेवकांनी तयार केलेल्या शेततळ्याची पाहणी केली व बाजूच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. स्वयंसेवकांनी केलेल्या शेततळ्यामुळे शेजारील शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी तसेच बाजूलाच असलेल्या शाळेतील बोरवेलला फायदा होत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कोमल कवडे व अमर पवार तर आभार प्रदर्शन कोमल दराडे यांनी केले. स्वागत गीत वेदांत बोरुडे तर पाहुण्यांचा परिचय शिवकन्या नायक यांनी दिला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी यांची उपस्थिती लाभली. सरतेशेवटी ग्रामस्थांचे आभार मानून दत्तक ग्राम सवड येथील आठ दिवशी विशेष शिबिराचा समारोप करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना ग्रुप प्रमुख अमर पवार ,पूजा पोळकर आदर्श स्वयंसेवक:- सौरभ खोटे
आदर्श आदर्श स्वयंसेविका:- कोमल दराडे आदर्श ग्रुप लीडर:- पलाश तायडे, गायत्री देशपांडे आदर्श रासेयो गट म्हणून ' शिवनेरी ग्रुप' ''पन्हाळगड' या गटाला देण्यात आला.
0 Comments