प्रतिनिधी।कारंजा
कारंजा तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम कामरगांव हे लोकसंख्येने मोठे गांव असून याच्या परिसरात १४ गावांचा समावेश आहे सध्या स्थिती मध्ये कामरगाव पोलीस चौकीकडे कामरंगाव सह अन्य १४ गावे जोडलेली आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात भार असून सुद्धा या ठिकाणी फक्त ६ पोलीस कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याने कामरगाव पोलीस चौकीला पोलीस स्टेशन चा दर्जा देण्याची मागणी राका नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक अशोक परळीकर व अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीमती सोनालिताई ठाकूर यांनी २९ मार्च रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन उपरोक्त मागणी केली.गृहमंत्री वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,ग्राम कामरगाव हे मुख्य महामार्गाला लागून असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात झपाट्याने विस्तार होत आहे परंतु असे असून सुध्दा सदर गांवाला स्वतंत्र पोलीस स्टेशन नाही सदर गावाला पोलीस चौकी उपलब्ध असून त्याला या महामार्गा पासून ब-याच • आतमध्ये असलेल्या कामरगांवच्या तुलनेत लहान असलेल्या धनज(बु) पोलीस स्टेशनला जोडलेले आहे व पोलीस बळाची संख्या अत्यंत कमी स्वरुपाची असून फक्त ६ पोलीस कर्मचारी व अधिकारी उपलब्ध करुन दिलेले आहे.सदर मनुष्यबळ कामरगांवच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात आहे, आजच्या परिस्थितीत सदर गावाला स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सदर गांव हे नागपूर-औरंगाबाद हायवे व त्याला जोडून असलेल्या अमरावती या मुख्य महामार्गावर स्थित आहे व सदर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर जडवाहन, खाजगी प्रवासी वाहन तसेच • सार्वजनीक प्रवासी वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर ब-याचवेळी अपघात होतात आणि अशावेळी पोलीस चौकीमध्ये उपलब्ध असलेले संपूर्ण पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना घटनास्थळावर जावे लागते परीणामी पोलीस चौकीमध्ये एखादा कर्मचारी उपलब्ध असतो व उर्वरीत पोलीस कर्मचारी अपघात स्थळी गेल्यास अशावेळी परिसरात कोणतीही अनुचित घटना घडल्यास ऐनवेळी धनज (बु) पोलीस स्टेशनला कळवून पोलीस कुमक बोलवावी लागते व त्यामुळे वेळ वाया जाऊन धावपळ होते व कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
म्हणून गृह विभागा कडून कामरगांवला स्वतंत्र पोलीस स्टेशनचा दर्जा उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य ती कारवाई करून त्यानुसार पोलीस बळाची संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे.
0 Comments