कारंजा [लाड]: भारतिय मौसम विभाग, मुंबईच्या आज दि.29 मार्च 2022 रोजी प्राप्त झालेल्या शासकिय बिनतारी संदेशान्वये, हवामान निरीक्षकाचे निरीक्षणानुसार, दि.29 मार्च ते दि .02 मार्च 2022 पर्यत, जिल्ह्यात व पंचक्रोशीत तापमानातील हवामानाच्या बदलानुसार, तिव्र स्वरूपाची उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, ताप येणे, अशक्तपणा असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतोवर उन्हापासून प्रत्येकाने सतर्क राहून, स्वसंरक्षण करावे . शक्यतोवर दिवसा उन्हात घराबाहेर पडूच नये.आणि शारिरिक श्रमाची म्हणजे अंग मेहनतीची कामे टाळावीत.असे स्पष्टपणे शासनाने आवाहन केलेले असल्याची माहिती - महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम जिल्हयाला प्राप्त झाली असल्याचे,वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळवीले आहे.तसेच त्यांनी आपल्या जिल्हयातील नागरिकांना सतर्क करतांना सांगीतले की, प्रत्येक माणसाने उन्हापासून स्वतःचा बचाव करण्या करीता, शक्यतोवर पांढऱ्या रंगाचे कॉटनचे सुती कपडेच वापरावे.घराबाहेर पडतांना सन - गॉगल्स, डोक्याला पातळ उपरणे / दुपट्टे / कॅपस् वापरावी. बाहेर फिरतांना सोबत कापूरवड्या, पांढरा कांदा ठेवून त्याचा वास घेत जावे,बर्फाचे पाणी पिऊ नये.सोबत पाणी ठेवावे, उन्हातून आल्यानंतर लगेचच ढसढसा पाणी पिऊ नये, सकाळी साधे जेवण करूनच बाहेर पडावे, उपवाशी राहू नये . शक्यतो गुल्कान - डी पावडर, ओ आर एस पावडर सोबत ठेवावी . व त्याचे पाणी घ्यावे.एवढी पथ्य बाळगून उन्हाळ्याचा त्रास कमी करता येईल.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments