प्रतिनिधी:- वनोजा
आज शुक्रवार ४ मार्च २०२२ पासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे, कोरोना संकट नियंत्रणात असल्यामुळे बारावीची परीक्षा परंपरागत पद्धतीने 'ऑफलाइन' आज बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर झाला असुन वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथिल श्रीमती. साळुंकाबाई राऊत कनिष्ठ महाविद्यालय व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षेला शांततेत सुरुवात झाली आहे.
यंदा जिथे बारावीचे विद्यार्थी शिकत आहेत, त्या प्रत्येक कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र आहे. कोरोना काळात दीर्घकाळ ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम सुरू होता. विद्यार्थ्यांची सलग काही तास लेखन करण्याची सवय मोडली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी तीन ऐवजी साडेतीन तासांचा अवधी दिला आहे.
यावेळी परीक्षा केंद्रांवर आलेल्या विद्यार्थ्यांना कोविड नियमांचे सर्व पालन करून, परीक्षेसाठी पाठवण्यात आले. वनोजा येथिल श्रीमती. साळुंकाबाई राऊत कनिष्ठ महाविद्यालयात १३८ परीक्षार्थी व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे ४८ परीक्षार्थी असे एकुण १८६ परीक्षार्थींनी वनोजा येथिल दोन परीक्षा केंद्रावर इंग्रजीचा पहिला पेपर दिला आहे.
यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असुन, मंगरुळपीरचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड यांनी वनोजा येथिल परीक्षा केंद्रावर येथे भेट दिली.


0 Comments